गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा (Photo)

rohit raut engagement
rohit raut engagement
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. रोहित राऊत-जुईली जोगळेकर यांच्या साखरपुड्याचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.  सध्या दोघांच्याही घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

जुईली हिचा हळदी-कुंकू समारंभही पार पडला आहे. त्यापूर्वी लग्नाआधीच्या पूजेच्या विधींना सुरूवात झाली आहे. जुईलीची ग्रहमख पूजादेखील पार पडलीय. या सर्व समारंभाते फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

जुईली आणि रोहित गेल्या काही दिवसांपासूनंच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत आङेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्यातील मैत्री, प्रेम सर्वांसमोर दिसत आहे.

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर दोघांनीही एकत्र केलेली पहिला इव्हेंट म्हणत खास फोटो शेअर केला आहे. या कॅप्शनसोबत रोहिली आणि सिक्स डेज टू गो असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. त्यामुळे २३ जानेवारीला हे दोघंही लग्न करणार असल्याची त्यांनी म्हटलं आहे.

याआधी रोहित आणि जुईली यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी त्यांचे दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केलेले दिसतात. आता त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट, गृहमख सोबतचं साखरपुड्याचेही काही फोटो शेअर केले आहेत. मराठी कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची चर्चा होतेय.

रोहि-जुईली गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी केळवणचे फोटोदेखील शेअर केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news