मार्व्हलचा नवा सुपरहीरो! | पुढारी

मार्व्हलचा नवा सुपरहीरो!

पुढारी ऑनलाईन

स्पायडर मॅन : ‘नो वे होम’नंतर मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या नव्या दौरला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात आपल्याला ‘डेअरडेव्हिल’चे दर्शन घडले होते. आता आणखी एक नवा सुपरहीरो मार्व्हलने समोर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच मार्व्हलच्या आगामी ‘मून नाईट’ (चेेप घपळसहीं) या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातून कॉमिक्समधून मोठ्या पडद्यावर आणखी एक सुपरहीरो मार्व्हलने आणला आहे.

अभिनेता ऑस्कर आयझॅक याने यात मुख्य भूमिका साकारली आहे, तर अभिनेता ईथन हॉक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकन सैन्यात काम केलेला एक युवक, ज्याला तो झोपला आहे की, जागा आहे, हे समजतच नाहीय. याच गदारोळात त्याला त्याची खरी ओळख सापडते. चंद्राकडून शक्ती मिळणारा हा सुपरहीरो असेल. होळीनंतर डीस्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रीलिज होणार आहे.

Back to top button