JSW Infrastructure IPO | गुंतवणूकदारांना संधी! १३ वर्षांनंतर आला JSW ग्रुप कंपनीचा आयपीओ

JSW Infrastructure IPO | गुंतवणूकदारांना संधी! १३ वर्षांनंतर आला JSW ग्रुप कंपनीचा आयपीओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज २५ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आठवड्यात प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच IPO (इनिशियल पब्लिक ऑफर) चा ओघ अधिक राहणार आहे. यात महत्त्वाचा म्हणजे पोर्ट संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा (JSW Infrastructure) आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. विशेष म्हणजे सुमारे १३ वर्षांनी JSW ग्रुप कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी बाजारात आला आहे. २७ सप्टेंबरपर्यंत याचे सबस्क्रिप्शन घेता येईल. (JSW Infrastructure IPO)

संबंधित बातम्या 

हा आयपीओ खुला होण्यापूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांमार्फत १,२६० कोटी रुपये उभारले आहेत. मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स, अबॅक्कस इन्व्हेस्टमेंट, एसबीआय म्युच्यूअल फंड आणि सिंगापूर सरकार आदींनी अँकर फेरीत सहभाग घेतला होता.

JSW ग्रुप कंपनीने या IPO साठी प्रति शेअर ११३-११९ रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे. या IPO साठी कंपनीने १२६ शेअर्सचा लॉट साइज निश्चित केला आहे.

अप्पर प्राइस बँडवरून या IPO द्वारे एकूण २,८०० कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य आहे. या IPO अंतर्गत कंपनी २,८०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. या IPO मध्ये OFS घटक समाविष्ट नाही. JSW इन्फ्रास्ट्रक्चरने २२ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून १,२६० कोटी आणि अपडेटर सर्व्हिसेसने २८८ कोटी उभारले आहेत, जो इश्यू सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. (JSW Infrastructure IPO)

व्हॅलिअंट लॅबोरेटरीज

त्याचबरोबर फार्मा कंपनी व्हॅलिअंट लॅबोरेटरीजने (Valiant Laboratories) त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी १३३-१४० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ २७ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. तर हा इश्यू ३ ऑक्टोबर रोजी बंद होईल.

प्लाझा वायर्स

दिल्ली येथील प्लाझा वायर्स आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी २९ सप्टेंबरपासून खुला होईल आणि ४ ऑक्टोबरला बंद होईल. या आयपीओची किंमत प्रति शेअर ५१-५४ रुपये आहे. यातून ७१.२८ कोटी रुपये उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे.

मनोज वैभव जेम्सचा IPO

मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्स, जे त्याच्या वैभव ज्वेलर्स या ब्रँड नावाने ओळखले जातात; त्यांचा २६ सप्टेंबर रोजी २७० कोटी रुपयांचा पहिला सार्वजनिक इश्यू बंद करणार आहे. या आयपीओने २०४-२१५ रुपयांच्या प्राइस बँडसह १३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवले आहे. (Manoj Vaibhav Gems IPO)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news