साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , २४ ते ३० सप्‍टेंबर २०२३ | पुढारी

साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , २४ ते ३० सप्‍टेंबर २०२३

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की , तुम्‍हाला आठवड्यात कुटुंबातील सदस्‍याच्‍या यशाचा अभिमान वाटेल. करिअरसाठी उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी सक्रिय राहिल्याने कामे सुरळीत पार पडतील. तुम्ही आरोग्याबाबत जागरूक राहाल. प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल. प्रवासाचे योग आहेत. परदेश प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळू शकते.

वृषभ

वृषभ : तुमही या आठवड्यात कामातून विश्रांती घेण्यास उत्सुक असाल, असे श्रीगणेश म्‍हणतात. सुट्टीवर जाण्याचा विचार करू शकता. घराचे नूतनीकरण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्‍या. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील. एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च केलेला पैसा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधांसाठी काळ थोडा संमिश्र असेल. तुमच्या जोडीदाराला या आठवड्यात जागेची आवश्यकता असेल, त्यामुळे त्याच्या मुद्द्याचा आदर करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आहारावर नियंत्रण ठेवा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. कामाच्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे, हट्टी स्वभावामुळे समस्या उद्भवू शकतात.

कर्क

कर्क : हा आठवडा तुम्‍हाला अनुकूल असेल, असे श्रीगणेश सांगतात. जोडीदाराशी सूर जुळेल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये बचत करण्याच्या मूडमध्ये असाल. अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात गृहिणी घराच्‍या नूतणीकरणाचा विचार करतील. सर्वच कार्यात सावधगिरी बाळगा. तुमचे ध्येय साध्य होण्‍यास अडथळे निर्माण होण्‍याची शक्‍यता, परिचित लोक भेटतील यामुळे भविष्यात लाभदायक घटना घडण्‍यास उपुयक्‍त ठरणार आहे.

सिंह

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात कोणतेही महत्त्‍वाचे काम हातात घेऊ नका. प्रेम संबंधात मतभेद होण्‍याची शक्‍यता. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही वैयक्तिक समस्या त्वरित सोडवण्‍यावर भर देणे आवश्यक आहे. घाई करणे टाळा. आरोग्याशी संबंधित समस्येवर घरगुती उपायांनी फायदा होईल. विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचा वापर करत स्पर्धात्मक परिस्थितीत कठोर परिश्रम करत रहावे.

कन्या

कन्या : हा आठवडा तुमच्यासाठी व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या चांगला राहील. नशिबामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.या आठवड्यात प्रेमसंबंधांसाठी काळ संमिश्र राहीलं. तुमच्या जोडीदाराच्या मतांचा आदर करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आहारावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी काळजी घ्‍या. हट्टी स्वभावामुळे समस्या उद्भवू शकतात.

तुळ

तूळ : हा आठवड्यात तुम्‍ही करिअरवर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. काही परिस्थितींमुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना विलंब होण्याची शक्यता. कोणतीही महत्त्वाची जबाबदारी घेण्यापूर्वी सुरुवातीपासून विचार करा. कुटुंबातील कामांना प्राधान्‍य द्या. घरात बदल करण्याच्या तुमच्या इच्छेशी कुटुंबातील सदस्‍य सहमत होणार नाहीत. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल.

राशिभविष्य

वृश्चिक : गणेश सांगतात की. शिक्षण क्षेत्राशी संबंधितांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.तुम्ही आरोग्याबाबत खूप जागरूक असाल. खर्चावर नियंत्रण राहिल्‍याने पैशाशी संबंधित समस्या जाणवणार नाहीत. तुमचे लक्ष अधिक बचत करण्यावर असेल. प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल आहे. यश लाभल्‍यामुळे सुखावाल.

राशिभविष्य

धनु : शेअर बाजाराशी संबंधित लोकांनी या आठवड्यात हुशारीने पैसे गुंतवावेत. या आठवड्यात पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये नशीबाची म्‍हणावी तितकी साथ लाभणार नाही, असे श्रीगणेश म्‍हणतात. आरोग्याची काळजी घ्‍या. परिस्थितीचा स्‍वीकार करा. कामावर तुम्ही ज्याची अपेक्षा करत आहात ते लवकरच घडण्याची शक्यता आहे. चांगल्या कामगिरीमुळे यशाची शक्यता वाढत आहे.

राशिभविष्य

मकर : नोकरीत तुमच्‍या कामगिरीमुळे वरिष्ठ प्रभावित होतील, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्‍या आजारावर पर्यायी औषधाचा फायदा होईल. अभ्यासात केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील आणि तुम्हाला तुमची उद्दिष्टे गाठण्याच्या जवळ आणतील. पर्यटनाचा बेत आखाल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल परिणामाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा आनंदाचा काळ आहे. पैशाशी संबंधित बाबींसाठी काळ चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता.

कुंभ

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात कुटुंब आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ व्‍यतित कराल. आर्थिक बाबतीत मदत लाभेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधांबाबतीत आठवडा समाधानकारक राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुमच्या स्वभावाने संपर्कात येणार्‍या लोकांना प्रभावित कराल. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मेहनत करा.

मीन

मीन : कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधितांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासाबाबत निश्चित दिशा स्वीकारणे ही तुमच्यासाठी योग्य वाटचाल ठरेल. या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे थोडे सावध राहा. चेष्टेने सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या प्रिय व्यक्ती किंवा मित्रांकडून वाईट रीतीने घेतली जाऊ शकते, वरिष्ठांच्या धोरणांमुळे तुम्ही गोंधळात पडू शकता.

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

Back to top button