Jason Roy : जेसन रॉय इंग्लंडला सोडून लीगमध्ये खेळणार

Jason Roy : जेसन रॉय इंग्लंडला सोडून लीगमध्ये खेळणार
Published on
Updated on

लंडन : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर लाथ मारण्याच्या तयारीत आहे. जेसन युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेत होणार्‍या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात खेळण्यास उत्सुक आहे. हा हंगाम 13 पासून 30 जुलैपर्यंत होणार आहे. रॉय पाठोपाठ रीसे टॉप्ले देखील जेसन रॉयच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून तो कसा सावरतो यावर अवलंबून आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड वार्षिक जवळपास 66,000 पौंडस रुपये खेळाडूंना देते. (Jason Roy)

इसीबी हे क्रिकेट जगतातील सर्वात जास्त रक्कम देणार्‍या क्रिकेट संघटनांपैकी एक आहे. ईसीबीने हॅरी ब्रुक, डेव्हिड मलान, मॅथ्यू पॉटस्, जेसन रॉय, टॉप्ले आणि डेव्हिड विली यांच्याशी देखील 2022-23 साठी हाच करार केला होता. मेजर लीग क्रिकेट ही 13 जुलैलापासून टेक्सास येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील फ्रँचायझींचा समावेश आहे. रॉय हा एल ए नाईट रायडर्स संघाकडून खेळण्याची शख्यता आहे. मात्र, यासाठी त्याला ईसीबीचा करार सोडावा लागणार आहे. ही स्पर्धा आणि इंग्लंडची टी-20 ब्लास ही स्पर्धा क्लॅश होण्याची शक्यता आहे. जर मेजर लीग क्रिकेटचा विस्तार झालाmajor league cricket तर त्याचा परिणाम भविष्यात इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेवर होणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे करारबद्ध खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे. (Jason Roy)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news