Kuno Park : कुनो पार्कमधील चित्त्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू | पुढारी

Kuno Park : कुनो पार्कमधील चित्त्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची एकूण संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिलांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे झाला असल्याचं वनविभागाने स्पष्ट केलं आहे. (Kuno Park)

वनविभागाने प्रेस नोट जारी करत म्हटले आहे की, “मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती बछड्यांसह एका ठिकाणी बसलेली आढळली. काही काळाने तिच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. निरीक्षण पथकाने पशुवैद्यकांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Kuno Park)

अशक्तपणामुळेच बछड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असल्याचे वनविभागाने सांगितले. चित्ता ज्वाला सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आली होती. तिला पूर्वी सिया या नावाने ओळखले जात होते. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिने चार बछड्यांना जन्म दिला होता. (Kuno Park)

नामिबियातील चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. तर दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय या चित्ताचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतून आणलेली दक्षा ही मादी चित्ता जखमी होवून तिचा मृत्यू झाला. भारतातील वाढते तापमान हे या चित्यांच्या मृत्यूमागे कारण असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा;

Back to top button