Jalgaon hailstorm : जळगाव जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा, पिकांचे नुकसान

Jalgaon hailstorm : जळगाव जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा, पिकांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा– हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला. रात्रीतून झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्ता उद्धवस्त झाला आहे.

जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, रावेर, अमळनेर, चोपडा या ठिकाणी सोमवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपिटीेने हजेरी लावली. दरम्यान सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्री अचानक पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिके आडवी झाली.

उन्हाळ कांद्याला काढणीच्या तोंडावरच अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. पारोळा तालुक्यात रात्री करंजी बुद्रुक, वेल्हाणे, बोळे, करमाड, तामसवाडी या परिसरात गारपीट झाली. तर पिंपरी, मोंढाळे, आडगाव, शिरसोदे, बहादरपूर, विचखेडे, उंदीरखेडे, शिरमणी व इतर भागात गारपिटीसह पाऊस झाला. अमळनेर तालुक्यात पातोंडा, सडावण, टाकरखेडा या ठिकाणी गारपीट झाली. धरणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. एरंडोल तालुक्यात तहसीलदार यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news