Bird Migration : वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्षांची संख्या घटली

Bird Migration : वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्षांची संख्या घटली
Published on
Updated on

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मध्येच पाऊस, आभाळ या वातावरणामुळे यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. वातावरणातील या बदलाचा परिणाम स्थलांतरित पक्षांवर पडला आहे. त्यांची संख्या घटली असल्याचे पक्षीमित्रांच्या पाहणीतून समोर आले आहे. सद्यस्थितीत युरोप, मध्य आशिया, चीन, मंगोलियातून स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. दरम्यान, हवामानातील बदलांमुळे पक्षांना अस्वस्थता, थकवा येऊ शकतो आणि त्यांच्या मृत्यूची शक्यता वाढू शकते, अशी धोक्याची घंटा पक्षीमित्रांनी व्यक्त केली. (Bird Migration)

मागील वर्षी त्रिकूट येथे युरोप, मध्य आशियातून ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, रुडीशेल्डक, उत्तर युरेशियातून कॉमन टील, मंगोलियातून ब्लॅक हेडेड इबिस, मध्य आशियातून लिटल रिंग्ड प्लॉवर, युरोप, चीन, मध्य आशिया, जपानमधून कॉमन स्पूनबिल, युरोपमधून नॉर्थन पिनटेल, इंडियन स्पॉट बिल्ड डक, कॉमन पोचार्ड, लिटल ग्रीब, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक हेडेड आयबिस, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, कॉमन सँडपायपर, नॉर्दर्न पिनटेल आदी हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी व इतर स्थानिक पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आली होती. त्रिकुट येथे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या नोंदमध्ये वरील सर्व पक्षांची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. तर, भोकर येथील नांदेड किनवट रोडवरील सुधा प्रकल्पात स्थलांतरीत पान पक्ष्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या एवढी नोंद झाली आहे. तसेच अर्धापूर तालुक्यातील चोरांबा येथील तलाव अगदी निसर्ग सौंदर्यानी नटलेला आहे. या तलावाच्या दोन बाजूनी डोंगररांगा असून खालच्या बाजूला पक्ष्यांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात आहे. परंतू येथेही स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या कमी दिसून आली, असे पक्षीमित्र प्रा. डॉ. जयवर्धन बलखंडे यांनी सांगितले. (Bird Migration)

केरूर माळरानात युरोपातून आला 'पॉलिड हॅरियर'

युरोप खंडात आढळणारा द पॉलिड हॅरियर हा स्थलांतरित पक्षी नांदेड जिल्हयातील देगलूरच्या केरूर गवताळ माळरानात आगमन झाले आहे. हा शिकारी स्थलांतरित पक्षी आहे. उत्तरेकडे थंडी वाढली की, पक्ष्यांचे खाद्य संपून जाते. त्यामुळे ते उडत दक्षिणडे येतात. मार्च, एप्रिलपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. छोटे पक्षी, पाल, किडे, नाकतोडे, उंदीर हे त्यांचे खाद्य आहे, असे पक्षी निरिक्षक तथा वनपाल संजय कोंपलवार यांनी सांगितले. (Bird Migration)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news