Jalgaon : परिविक्षाधीन तहसीलदारांना जेसीबीद्वारे चिरडण्याचा प्रयत्न; रावेर तालुक्यातील घटना

Jalgaon : परिविक्षाधीन तहसीलदारांना जेसीबीद्वारे चिरडण्याचा प्रयत्न; रावेर तालुक्यातील घटना
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी वाढत चालली आहे.  अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई केल्याने परिविक्षाधीन तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केला.  तर मंडळाधिकाऱ्याला चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलून दिल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांनी रावेर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी (दि. १२) रात्री उशिरा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पातोंडा शिवारातील भोकर नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकास मिळाली होती. यानंतर परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, मंडळाधिकारी जनार्दन भंगाळे, यासीन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर, कोतवाल प्रवीण धनके आदींच्या पथकासह पातोंडी शिवारात भोकर नदीपात्रात गेले होते.

८ ते ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

यावेळी अवैध गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करणारा जेसीबी (एम.एच.१९ डी.व्ही.३७३९) तसेच ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.१९ ए १३११) ट्रॉलीसह व एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत होते. याठिकाणी कारवाईसाठी पथक गेल्यानंतर मोहन बोरसे याने जेसीबी सुरू करुन अंगावर आणला. मात्र सतर्कतेने बाजूला झाल्याने तहसीलदार कळसे बचावले तर संशयित जेसीबी घेऊन पसार झाला. या प्रकरणी मोहन बोरसे, मनोज बोरसे (दोन्ही रा.पातोंडी) व त्यांच्यासोबतचे ८ ते ९ इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विशाल सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news