‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रम ; शेवगावमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घेतली बैठक

‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रम ; शेवगावमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घेतली बैठक

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेस एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जातीवाचक पोस्ट टाकणे, स्टेटस ठेवणे व व्हायरल करणार्‍यांना खबरदार आता पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सध्या राज्यात जातीय तेढ निर्माण करणार्‍या घटना घडत आहेत. शेवगाव शहरातही महिन्यापूर्वी असा प्रकार घडला असून अद्यापि काहीसा तणाव आहे. भविष्यात यावर पायबंद बसावा, या दृष्टीणे शेवगाव शहर व तालुक्यात असलेल्या 250 मेडिकल स्टोअर्सवर रस्ते निगराणीखाली येण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

तसेच जातीय-धार्मिक तेढ निर्माण केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास व यास ग्रुप अ‍ॅडमिन साक्षीदार होऊण थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने पोलिसांनी खरबरदारीचा इशारा दिला आहे. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनची बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व मेडिकल स्टोअर्सधारकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत सूचना देण्यात आल्या.

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्याने मेडिकल स्टोअर्संनी येत्या वीस दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यापैकी एक कॅमेरा पोलिसांसाठी उपक्रमाचे सहकार्य करण्यास अनुमती दर्शविली. सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट़ टाकणे, स्टेटस् ठेवणे व व्हायरल करणे याबाबत कोणीही सोशल मिडीयातुन किंवा एखाद्या ठिकाणाहुन धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अथवा पोस्ट़ व्हायरल केल्यास संबधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले. बैठकीस केमिस्ट़ अण्ड ड्रगिस्ट़ संघटनेचे तालुकाध्यक्ष सूरज अरुणराव लांडे, जितेश केवळ, आशिष राठी, जोहेब पटेल, सोमनाथ साखरे, पांडुरंग लबडे, दुर्गेश काथवटे, मोहम्म़द सय्यद, फैजान सय्यद, संतोष निजवे, शिरीष घनवट, संकेत गवळी, विजय पायघन, ज्ञानेश्वऱ बडे, बाळासाहेब देशपांडे आदी हजर होते.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news