पुणे : उपाहारगृहातील रोकड, साहित्य चोरणार्‍या कामगारांना अटक | पुढारी

पुणे : उपाहारगृहातील रोकड, साहित्य चोरणार्‍या कामगारांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपाहारगृहातील दहा हजारांची रोकड, इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरणार्‍या कामगारांना मार्केट यार्ड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून रोकड, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नूर आलम ऊर्फ साबीर अकबर शेख (वय 30), इम—ान मोहंमद शेख ऊर्फ राजेश जॉन शेख (वय 20), जहाँगीर नजिरुल मौला (वय 27, तिघे रा. गोविंदपूर, पश्चिम बंगाल) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत नितीन राजाराम कोंढाळकर (वय 52, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढाळकर यांचे मार्केट यार्ड परिसरात उपाहारगृह आहे. आरोपी शेख, मौला कोंढाळकर यांच्या उपाहारगृहात कामगार आहेत. कोंढाळकर यांनी उपाहारगृह बंद केल्यानंतर मध्यरात्री आरोपींनी बनावट चावीने कपाट उघडले. कपाटातील दहा हजारांची रोकड, सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर, राऊटर असा मुद्देमाल चोरून नेला. गस्त घालणार्‍या मार्केट यार्ड पोलिसांच्या पथकाने तिघांना पकडले. सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

मुंबई : जुहू कोळीवाडा समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

Indian Celebs : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत या कलाकारांनी गाजवली चित्रपट इंडस्ट्री

Back to top button