पुढारी ऑनलाईन डेस्क : Florona case in Israel : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट नंतर आता जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron) धुमाकूळ सुरु आहे. कोरोना विरोधात लसीकरणही वेगाने सुरु आहे. तरीही सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. याच दरम्यान एक चिंताजनक बातमी इस्राईल मधून आली आहे. इथे फ्लोरोना (Florona case in Israel) चा पहिला रुग्ण आढळून आला आहे.
एका वृत्तानुसार, इस्राईल मध्ये फ्लोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोविड-१९ (Covid-19) आणि इन्फ्लूएंझा (Influenza) यांच्या दुहेरी संक्रमणाला फ्लोरोना म्हटले जाते. अरब न्यूजने इस्राईल मधील एका वृत्तापत्रातील रिपोर्टच्या हवाल्याने हे वत्त दिले आहे. या वृत्तानुसार, रुबिन मेडिकल सेंटरमध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला फ्लोरोनाची लागण झाली आहे.
इस्राईलने ३१ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा चौथा डोस देण्याची मोहीम सुरु केली आहे. ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे; अशा लोकांना चौथा डोस दिला जात आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव सुरु झाल्यानंतर नागरिकांना लसीचा चौथा डोस देणारा इस्राईल पहिला देश आहे.
इस्राईल हा जगातील पहिला देश आहे ज्याने कोरोना लसीकरण पहिल्यांदा सुरु केले. आता प्रतिकारशक्ती कमकुवत असणारे लोक आणि वृद्धांना लसीचा चौथा डोस दिला जात आहे.
हे ही वाचा :