ओमायक्रॉन : ही ६ उपकरणं घरी हवीत! | पुढारी

ओमायक्रॉन : ही ६ उपकरणं घरी हवीत!

देशात कोरोनाची रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलेली आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हॅरिएंटचे रुग्ण भारतातही सापडू लागलेले आहे. या व्हॅरिएंटमुळे प्रकृती गंभीर होण्याची, रुग्णालयात दाखल करावे लागण्याची वेळ फार कमी प्रमाणात येत असली तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेली काही वैद्यकीय उपकरणे आपल्या आरोग्यावर लक्ष ठेण्यासाठी चांगली मदत करू शकतात. यातील ९ उपकरणांची ही माहिती.

१. ऑक्सिमिटर ( ओमायक्रॉन )
पल्स ऑक्सिमिटर घरात असले पाहिजे, असे उपकरण आहे. कोरोना काळात घरातील अत्यावश्यक उपकरण म्हणजे पल्स ऑक्सिमिटर होय. कोरोना झालेल्या रुग्णांच्या रक्तातील ऑक्जिनची पातळी सतत तपासावी लागते. यासाठी हे उपकरण महत्त्वाचे ठरते. ऑनलाईन तसेच मेडिकल स्टोअरमध्येही हे उपकरण मिळते. अंदाजे ५०० ते २५०० रुपये इतकी याची किंमत आहे.

२. डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर ( ओमायक्रॉन )
रक्तदाब मोजण्यासाठी हे उपकरण उपयोगी पडते. डिजिटर प्रकारे रक्तदाब मोजला जात असल्याने, कोणालाही हे उपकरण हाताळता येते. चांगल्या प्रकारच्या ब्लड प्रेशर मॉनिटरची किंमत ३ हजार रुपयापर्यंत जाते.

३. कॉनटॅक्टलेस थर्मामीटर
रुग्णाच्या शरीराला स्पर्श न करताही रुग्णाचे तापमान मोजण्यासाठी कॉनटॅक्टलेस थर्मामीटर वापरला जातो. बाजारतील याची किंमत १ हजार रुपयांपर्यंत आहे. रुग्णाला स्पर्श करावा लागत नसल्याने संसर्ग फैलावण्याची भीती कमी होते.

४. रॅपिड अँटिजेन सेल्फ टेस्ट किट

याला उपकरण म्हणता येणार नाही. पण या किटच्या मदतीने आपण घरच्या घरी कोरोनाची टेस्ट करू शकतो. मेडिकल स्टोअरमध्ये ३०० रुपयापर्यंत या किटची किंमत जाते.

५. ग्लुकोमीटर

जर घरी मधुमेहाचे रुग्ण असतील तर हे उपकरण घरात असले पाहिजे. अशा रुग्णांना जर कोरोनाचा संसर्ग झाला तर ग्लुकोमीटर फार उपयोगी ठरते.

६. पोर्टेबल ऑक्सिजन कॅनिस्टर

जर श्वास घेण्यात त्रास होत असेल तर पोर्टेबल ऑक्जिन कॅनिस्टर उपयोगी पडते. वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत काही वेळ श्वास घेण्यासाठी याचा उपयोग करता येतो. पण असे ऑक्सिजन फक्त तात्पुरता आधार म्हणून पाहिले पाहिजे, अशा वेळी योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असते.

याशिवाय युव्ही स्टरिलायजरचा उपयोग करून मोबाईल सारख्या उपकरणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयोगी पडते. शिवाय ऑक्सिजन कॉन्सर्ट्रेटर, एसपीओटू मोजण्याची सुविधा असलेले फिटबँडही घरी असणे उपयुक्त ठरते..

 

Back to top button