Israel-Hamas War : इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाह तळावर हल्ला

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली लष्कर हमासच्या विरोधात चौफेर हल्ले करत आहे. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाह तळांवर हल्ला केला आहे. आयडीएफने आधीच पायी मार्गाने गाझामध्ये प्रवेश केला आहे. इस्रायली लष्कराने गाझा शहरात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे जाण्यास सांगून, सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असतील. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर लोकांना परत जाण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हटलं आहे. (Israel-Hamas War )

गाझा शहरात प्रवेश…

इस्रायलने दहशतवाद्यांविरोधात  हल्ले सुरू केले आहेत. एकीकडे इस्रायल हमासच्या दहशतवाद्यांना मारत आहे. दुसरीकडे इस्रायली लष्कराने लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या ठाण्यांवरही हल्ले केले आहेत. इस्रायलने हिजबुल्लाच्या दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली सैन्याने पायी मार्गाने गाझा शहरात प्रवेश केला. आज दिवसाच्या अखेरीस इस्रायली सैन्याने गाझा पट्टीच्या काही भागात छापे टाकले, जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल आणि शस्त्रेही जप्त करता येतील आणि हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांनाही सोडवता येईल. गाझा शहरात हमासच्‍या दहशतवाद्यांनी बोगद्यांचे संपूर्ण जाळे तयार केले आहे, जे इस्रायली आर्मी उध्‍वस्‍त करत आहे. या बोगद्यांमधूनच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले. एपीच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की त्यांनी गाझा पट्टीच्या आत काही ठिकाणी छापे टाकले आहेत.

इस्रायली लष्कराने सूचना जारी केल्या

उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी इस्रायल संरक्षण दलाने सूचना जारी केल्या होत्या. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, 'गाझा शहरात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे जावे. गाझा शहराच्या खाली असलेल्या बोगद्यांमध्ये हमासचे दहशतवादी लपून बसले आहेत. जिथे इस्रायली सैन्य ऑपरेशन करणार आहे. हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल होता कामा नये. सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असतील. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर लोकांना परत जाण्याची परवानगी दिली जाईल.

Israel-Hamas War : हमासचे बोगद्यांचे जाळे

हमासने सांगितले की, कोणालाही कुठेही जाण्याची गरज नाही. इस्रायली लष्कराकडून खोटा प्रचार केला जात आहे. तुम्ही जिथे असाल तिथेच रहा. इस्रायलशी सामना करण्यास हमास पूर्णपणे सक्षम आहे. सध्याची परिस्थिती पाहता कधीही IDF उत्तर गाझा म्हणजेच गाझा शहरात प्रवेश करू शकतो. इस्रायलमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातूनही असेच संकेत मिळत आहेत. गाझामध्ये दोन शहरे असल्याचे सांगितले जाते. एक जमिनीच्या वर आणि दुसरा जमिनीच्या खाली. या बोगद्यांचा उपयोग हमासचे दहशतवादी लपण्यासाठी, तस्करी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी करतात. या मार्गांवरून इस्रायली लष्करापासून दहशतवादी सातत्याने पळ काढत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news