Israel-Hamas War : ‘हमास’ला पृथ्‍वीवरुन नष्‍ट करणार : इस्‍त्रायलच्‍या पंतप्रधानांनी घेतली शपथ | पुढारी

Israel-Hamas War : 'हमास'ला पृथ्‍वीवरुन नष्‍ट करणार : इस्‍त्रायलच्‍या पंतप्रधानांनी घेतली शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘ज्यू राष्ट्र (इस्रायल) एक आहे आणि आता त्याचे नेतृत्वही एकात्मतेत असेल, असे स्‍पष्‍ट करत आम्ही आक्रमक झालो आहोत. हमासशी संबंधित प्रत्येक सदस्याचा मृत्यू निश्चित आहे. संपूर्ण इस्रायल आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा असून, आम्‍ही हमासला पृथ्‍वीवरुनच नष्‍ट करणार,’ अशी शपथच इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ( Benjamin Netanyahu) यांनी घेतली. इस्‍त्रालयमध्‍ये ‘राष्ट्रीय आणीबाणीचे सरकार’ स्थापन करण्याची घोषणा केल्‍यानंतर आयोजित संयुक्‍त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Israel-Hamas War)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी परराष्ट्र मंत्री योव गॅलांट यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी संरक्षण मंत्री बेनी गँझ हेही उपस्‍थित होते. नेतन्याहू म्‍हणाले, दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्‍टोबर रोजी इस्‍त्रायलवर हल्‍ला केला. या हल्‍ल्‍याशी इस्रायलमधील प्रत्येक कुटुंब पीडितांच्या कुटुंबांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेले आहे. ‘ज्यू राष्ट्र (इस्रायल) एक आहे आणि आता त्याचे नेतृत्वही एकात्मतेत असेल. (Israel-Hamas War)

Israel-Hamas War : आम्‍ही आमच्‍या घरांसाठी एकत्र लढू

यावेळी नेतन्‍याहू यांनी हमास संघटनेने इस्‍त्रायलमध्‍ये केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतरच्‍या अत्‍याचाराचाही उल्‍लेख केला. ते म्‍हणाले, हमास या दहशतवादी संघटनेने इस्‍त्रायलमधील नागरिकांना जिंवत जाळले आहे. इस्रायलमधील प्रत्येक कुटुंब पीडितांच्या कुटुंबांशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेले आहे. आम्ही आक्रमक झालो आहोत. संपूर्ण इस्रायल आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा असून, आम्‍ही हमासला पृथ्‍वीवरुनच नष्‍ट करु. इस्रायलचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वासही नेतान्याहू यांनी व्‍यक्‍त केला. या वेळी संरक्षण मंत्री बेनी गँझ म्हणाले, ‘आम्ही सर्व एक आहोत. आपण सर्वजण या संघर्षात सामील आहोत. येथे एकच छावणी आहे आणि ती म्हणजे इस्राएल राष्ट्राची छावणी.

हेही वाचा : 

 

 

Back to top button