Israel-Hamas war | इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा आणखी एक म्होरक्या ठार; इस्रायलचा दावा

Israel-Hamas war
Israel-Hamas war

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलचे हमासच्या तळांवर हल्ले सुरुच आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, IDF लढाऊ विमानांनी हमासच्या तळांवर काल रात्रभर हवाई हल्ले केले. यामध्ये हमास एरियल ॲरेचा प्रमुख असम अबू रकाबा हा म्होरक्या ठार झाला. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Israel-Hamas war)

इस्रायलच्या IDF आणि ISA गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला अबू रकाबा हा हमासच्या यूएव्ही, ड्रोन, पॅराग्लायडर्स, एरियल डिटेक्शन आणि एरियल डिफेन्स कारवाईसाठी जबाबदार होता. ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडाच्या नियोजनात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच पॅराग्लायडर्सवर इस्रायलमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना निर्देश दिले होते. (Israel-Hamas war)

इस्रायल सैन्याने गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. इस्रायल सैन्याने पॅलेस्टिनी प्रदेशात जमिनीवर कारवाई सुरू केली आहे. इस्रायल सैन्याने शनिवारी (दि.२८) एन्क्लेव्हवर बॉम्बफेक केली. दरम्यान गाझा पट्टीमध्ये इंटरनेट सेवा आी फोन नेटवर्क पूर्णपणे कापण्यात आले आहे.

पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेने ८ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये हवाई केले. यानंतर हमासच्या रक्तरंजित हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायलने हवाई हल्ले सुरू केल्याने पॅलेस्टिनी मृतांची संख्या ७३०० च्या पुढे गेली. संयुक्त राष्ट्र महासभेने गाझामध्ये 'मानवतावादी युद्धविराम' पुकारला असून इस्रायल-हमास लढाई थांबवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्तावाला १२० राष्ट्रांनी पाठींबा दिला, १४ राष्ट्रांनी विरोधात मतदान केले तर ४५ राष्ट्रांनी गैरहजर राहून हा ठराव मंजूर केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news