Israel-Hamas conflict: अल-अक्सा मशिदीत नमाजवर इस्रायलचे निर्बंध

Israel hamas conflict
Israel hamas conflict

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धादरम्यान जेरुसलेममधील अल अक्सा मशीद आणि टेंपल माऊंटभोवती इस्रायली पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पंचावन्न वर्षांखालील लोकांना अल अक्सा मशिदीत नमाज पठणाला बंदी घालण्यात आली आहे. अल अक्सामध्ये नमाज अदा केल्यानंतर काही लोक बाहेर येतात आणि घोषणाबाजी करतात. निदर्शने करतात. अनेकदा ही निदर्शने हिंसक बनतात. जेरुसलेमच्या रस्त्यावर दगडफेक होते. हा पूर्वानुभव पाहता, हा निर्णय घेतला असल्‍याचे इस्रायलने स्‍पष्‍ट केले आहे.
(Israel-Hamas conflict)

दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर भीषण हल्‍ला केला. यानंतर हमास आणि इस्रायलमधील युद्ध पेटले. इस्रायलवरील हल्ल्याला हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा' (Al-Aqsa Mosque) असे नाव दिले हाेते. अल-अक्सा मशिदी हे ठिकाण हे इस्‍लाम धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे  ( Israel-Hamas conflict)

इस्रायल सैन्यापुढे आता भूमिगत हल्ल्याचे आव्हान

गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेला हमास-इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, इस्रायल सैन्याने आता युद्धविराम नाही असा इशारा दिला आहे. इस्रायलने पॅलेस्टिनमधील गाझा पट्टीत हल्ले सुरूच ठेवले आहेत. हवाई हल्ल्यानंतर इस्रायलने भूभागावरील कारवाया वाढवल्या आहेत. दरम्यान हमास संघटना भूमिगत कारवाया करत आहे. त्यामुळे इस्रायल सैन्यापुढे आता भूमिगत हल्ल्याचे आव्हान असणार आहे.  (Israel-Hamas conflict)

'अल-अक्सा'बद्दल इस्रायलची आक्रमकता कारणीभूत

हमास- इस्रायलमधील संघर्षाचे कारण बनलेली 'अल-अक्सा' ही मशीद पूर्व जेरुसलेमध्ये आहे. या मशिदीचे व्यवस्थापन वक्फ ट्रस्टकडे आहे. या प्रकरणातील स्थिती कायम ठेवण्यासाठी केलेल्या करारानुसार, या ट्रस्टचे नियंत्रण जॉर्डनला देण्यात आले होते. इस्रायल-नियंत्रित वेस्ट बँकचे प्रशासक, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे 'अल-अक्सा' वर कोणतेही नियंत्रण नाही. अब्बास म्हणतात की, सध्याच्या परिस्थितीला अन्य अनेक कारणांबरोबरच अल-अक्सा मशिदीसारख्या (Al-Aqsa Mosque) इस्लामिक ठिकाणांबद्दल इस्रायलची असलेली आक्रमकता देखील कारणीभूत आहे. मात्र इस्रायल सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news