Israel hamas conflict: ‘हमास’ने इस्रायल हल्ल्याला ‘ऑपरेशन अल-अक्सा’ असे नाव का दिले?

Israel hamas conflict
Israel hamas conflict
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने गेल्या शनिवारी (दि.७) इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात १ हजार ३०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३२०० नागरिक जखमी असून, १२० कुटूंबाना हमासने ओलीस ठेवले आहे. इस्रायलवरील या हल्ल्याला हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा' (Al-Aqsa Mosque) असे नाव दिले आहे. हे एक अशा पवित्र ठिकाणाचे नाव आहे, ज्यावरून इस्रायलमधील ज्यू आणि मुस्लिम यांच्यात दिर्घकाळ संघर्ष सुरू आहे.  (Israel hamas conflict)

संबंधित बातम्या:

हमास- इस्रायलमधील संघर्षाचे कारण बनलेली 'अल-अक्सा' ही मशिद पूर्व जेरुसलेमध्ये आहे. या मशिदीचे व्यवस्थापण वक्फ ट्रस्टकडे आहे. या प्रकरणातील स्थिती कायम ठेवण्यासाठी केलेल्या करारानुसार, या ट्रस्टचे नियंत्रण जॉर्डनला देण्यात आले होते. इस्रायल-नियंत्रित वेस्ट बँकचे प्रशासक, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे 'अल-अक्सा' वर कोणतेही नियंत्रण नाही. अब्बास म्हणतात की, सध्याच्या परिस्थितीला अन्य अनेक कारणांबरोबरच अल-अक्सा मशिदीसारख्या (Al-Aqsa Mosque) इस्लामिक ठिकाणांबद्दल इस्रायलची असलेली आक्रमकता देखील कारणीभूत आहे. मात्र इस्रायल सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. (Israel hamas conflict)

यावर्षी अरब आणि इस्रायली यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे. इस्रायली पोलिसांनी इस्लामिक ठिकाणांच्या कपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पॅलेस्टाईनमध्येच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम जगतात संतापाची लाट निर्माण झाली. अशा घटना रमजानच्या महिन्यात आणि ज्यूंच्या सणाच्या काळातच घडल्या. हमासकडून राबवण्यात आलेले 'ऑपरेशन अल-अक्सा' आणि तेव्हापासुन इस्रायलमध्ये निर्माण झालेली आक्रमक स्थितीमुळे जगभरातील मशिदींचा मुद्दा पुन्हा (Israel hamas conflict) महत्त्वाचा बनला आहे.

Israel hamas conflict: 'अल अक्सा' कोठे आहे?

'अल अक्सा' संकुल पूर्व जेरुसलेममध्ये आहे. हा भाग इस्रायलचा आहे. ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांमध्ये या कॉम्प्लेक्सची मोठी ओळख आहे. हे कॉम्प्लेक्स 35 एकरमध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांशी संबंधित पवित्र इमारती आहेत. या संकुलात प्रामुख्याने ६ पवित्र स्थाने आहेत. मुस्लिम अल अक्सा मशीद, डोम ऑफ द रॉक आणि डोम ऑफ चेन यांना त्यांची पवित्र ठिकाणे मानतात. वेस्टर्न वॉल, टेंपल माउंट आणि होली ऑफ होलीज ही ज्यूंसाठी पवित्र ठिकाणे आहेत.

'अल अक्सा' इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान

इस्लामिक धर्मग्रंथानुसार, 620 AD मध्ये, प्रेषित मोहम्मद यांना मक्का येथून अल अक्सा येथे नेण्यात आले, तेथून त्यांनी एका रात्रीत स्वर्गाचा प्रवास पूर्ण केला. कुराणानुसार, ज्या लोकांनी येथे तीर्थस्थान बांधले त्यात इब्राहिम, दाऊद, सुलेमान, इलियास आणि ईशा यांचा समावेश आहे. या सर्वांना कुराणात पैगंबर मानले गेले आहे. जगभरातील मुस्लिम वर्षभर या ठिकाणी येतात. पण रमजान महिन्यातील प्रत्येक शुक्रवार इथे खूप खास असतो. या दिवशी जगभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम येथे नमाज अदा करण्यासाठी येतात.

ज्यूंसाठी ही पवित्र ठिकाणं?

जेरुसलेमधील 'अल अक्सा' संकुला नजिक ज्यूंची देखील दोन महत्त्वाची ठिकाणं आहेत. एक 'टेंपल माउंट' आणि दुसरे म्हणजे 'होली ऑफ होलीज'. अल अक्सा कंपाऊंडभोवती बांधलेल्या भिंतीला 'टेंपल माउंट' म्हणतात. टेंपल माऊंटमध्येच एक भाग आहे, ज्याला 'वेस्ट वॉल' किंवा 'वेलिंग वॉल' म्हणतात. ज्यू लोक मानतात की, त्यांच्या इतिहासात पहिली आणि दुसरी अशी दोन मंदिरे होती. पहिला बॅबिलोनियन लोकांनी आणि दुसरा रोमन लोकांनी ते नष्ट केले. दुसऱ्या मंदिराची एक भिंत अजूनही अस्तित्वात आहे, तिला वेस्टर्न वॉल म्हणतात. ज्यू या भिंतीजवळ उभे राहून पूजा करतात. ते 'अल अक्सा' मध्ये आत जात नाहीत, कारण ते हे ठिकाण अतिशय पवित्र मानतात आणि ते अपवित्र होण्याची भीती असते. वेस्टर्न वॉलबद्दल मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, प्रेषित मोहम्मद यांनी आपला घोडा बुराक येथे बांधला होता, म्हणून ते या भिंतीला बुराक वॉल म्हणतात. 'अल अक्सा' मधील मुस्लिम आणि ज्यू धर्मियांमध्ये असा धार्मिक ठिकाणी आणि धार्मिक धारणेवरून वाद आहे, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news