‘हमास’ला इराणने पुरवली रसद! इस्‍त्रायलवरील हल्‍ल्‍याचा बेरूतमध्‍ये रचला कट

Israel-Hamas war
Israel-Hamas war

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (दि.७) इस्त्रायलवर रॉकेट हल्‍ला केला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्‍ल्‍यामागे हमास या दहशतवादी संघटनेला इराणने मदत केली असल्‍याचे वृत्त अमेरिकेतील 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले आहे. बेरूत येथे झालेल्या बैठकीत या हल्‍ल्‍याचा कट रचला गेला, असेही या रिपोर्टमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.
(Israel-Hamas war )

'वॉल स्ट्रीट जर्नल'च्‍या रिपोर्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, इस्‍त्रायलवर भीषण हवाई हल्‍ल्‍याचा कट इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे अधिकारी आणि हमास आणि हिजबुल्लासह अनेक इराण-समर्थित दहशतवादी गटांनी रचला. हमाससह लेबनॉनच्या हिजबुल्लासारख्या इराण-समर्थित दहशतवादी संघटनांच्या प्रतिनिधींसह इराणी अधिकाऱ्यांनी ७ ऑक्टोबर रोजी करण्‍यात येणार्‍याची हल्ल्याचा कट ऑगस्टमध्‍येच रचला होता. ( Israel-Hamas war )

Israel-Hamas war : बेरूतमध्‍ये रचला हल्‍याचा कट

हल्‍याचा कट लेबनॉनची राजधानी असणार्‍या बेरुत शहरामध्‍ये झालेल्‍या बैठकीमध्ये रचला गेला. यावेळी इराणी अधिकारी आणि हमास आणि हिजबुल्लाहच्‍या दहशतवाद्‍यांनी कट आखला. इस्‍त्रायलवर मोठ्या हल्ल्यासाठी इराणशी नियोजन आणि समन्वय आवश्यक होते, असेही या रिपोर्टमध्‍ये म्‍हटले आहे. "लंडन विद्यापीठातील एसओएएस मिडल इस्ट इन्स्टिट्यूटच्या संचालक लीना खतीब यांनी म्‍हटले आहे की, हमाससारखे दहशतवादी गट इराणच्या स्पष्ट मंजुरीशिवाय एकतर्फी युद्धात गुंतत नाहीत, लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशवादी संघटनाही अशाच एकतर्फी हल्‍ला करु शकत नाही."

सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील संबंध अधिक दृढ होत होते. ही मैत्री इराणसाठी धोकादायक ठरेल, या भीतातूनच इराणने हमास आणि हिजबुल्लाहच्‍या मदतीने इस्‍त्रायलवर हल्‍लाचा कट रचल्‍याचेही या रिपोर्ट म्‍हटले आहे.

इराणच्या सहभागाचे ठोस पुरावे सापडले नसले तरी, युरोपियन स्रोत आणि सीरियन सरकारच्या सल्लागाराने हमास आणि हिजबुल्ला सदस्यांनी दिलेल्या  माहितीची पुष्टी केली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी 'सीएनएन'ला सांगितले की, "आम्ही अद्याप या हल्ल्यामागे इराणचा सहभाग असल्याचे पुरावे पाहिलेले नाहीत; परंतु निश्चितच याचा काही संबंध आहे. दरम्‍यान, हमासचा दहशतवादी महमूद मिर्दावी याने दावा केला आहे की, इस्‍त्रायलवरील हल्ले पॅलेस्टिनी गटाने स्वतंत्रपणे आखले होते. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सोशल मीडियावरुन या हल्‍ल्‍यांचे समर्थन व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news