Imran Khan : चीन दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली, काश्मीर प्रश्नी केले खोटे आरोप

Imran Khan : चीन दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली, काश्मीर प्रश्नी केले खोटे आरोप

बिजिंग; पुढारी ऑनलाईन

चीनच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी भारताविरोधात खोटे आरोप केले आहेत. काश्मीरमध्ये निःपक्षपातीपणे जनमत घेण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या दुर्देशेकडे आणि भारतीय लष्कराच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या त्यांच्या इच्छेकडे जगाने दुर्लक्ष करू नये, असे आवाहन इम्रान खान (Imran Khan) यांनी केले आहे.

म्हणे, भारत काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन करत आहे. काश्मीरमधील भारताच्या गंभीर मानवी हक्क उल्लंघनाची जगाने आता दखल घेण्याची वेळ आली आहे ज्यात मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार कृत्ये तसेच सक्तीने लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा धोका समाविष्ट आहे. पाकिस्तान त्यांच्या काश्मिरी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभा आहे आणि त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या कायदेशीर लढ्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान मोदींचे दडपशाही धोरण काश्मिरी लोकांचा प्रतिकार चिरडण्यात अपयशी ठरले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पाकिस्तान आज ५ फेब्रुवारीला काश्मीर दिन साजरा करत आहे. ज्याची सुरुवात १९९० मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांनी केली होती. पाकिस्तान काश्मीर प्रश्नी अप्रचार करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

याआधी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसूफ यांनी म्हटले होते की पाकिस्तानला भारतासोबत शांतता हवी आहे. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चेचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news