घाऊक महागाई दर १४ टक्क्यांच्या खाली, सलग १६व्‍या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांवर

घाऊक महागाई दर १४ टक्क्यांच्या खाली, सलग १६व्‍या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांवर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मे महिन्यातील डब्ल्यूपीआय निर्देशांकाचे सुधारित आकडेदेखील आले असून हा निर्देशांक 15.88 टक्के इतका नोंदवला गेला असल्याचे व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले. जुलैमध्ये महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सलग सोळाव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर राहिलेला आहे, ही चिंताजनक बाब मानली जात आहे.

सरत्या जुलै महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक 13.93 टक्के इतका नोंदविला गेला आहे. तत्पूर्वीच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये हा निर्देशांक 15.18 टक्क्यांवर गेला होता. तर गतवर्षीच्या जूनमध्ये तो 11.57 टक्के इतका होता. जुलैमध्ये महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सलग सोळाव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर राहिलेला आहे, ही चिंताजनक बाब मानली जात आहे.

मागील जुलै महिन्यात मिनरल तेल, खाद्यान्न श्रेणीतील पदार्थ, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बेसिक मेटल्स, वीज, रसायने आणि रासायनिक पदार्थ यांच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. सलग दुसर्‍या महिन्यात घाऊक महागाईत घट झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरु झालेल्या युध्दामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ झाली होती. तर त्याच्या पाठोपाठ खाद्य पदार्थांचे भावदेखील अव्वाच्या सव्वा झाले होते.

महागाईची झळ केवळ भारताला बसत आहे असे नसून जगातील अनेक देश महागाईने त्रस्त आहेत. मागील दोन महिन्यात मात्र किंमती बर्‍यापैकी नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. अलिकडेच व्यापार मंत्रालयाकडून किरकोळ महागाईचे आकडे जारी करण्यात आले होते. त्यानुसार जुलैमधील किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. हा पाच महिन्यांचा निचांकी स्तर होता. तत्पूर्वीच्या महिन्यात सीपीआय निर्देशांक सात टक्क्यांवर गेला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news