Republic Day guests : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी रिक्षाचालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचाऱ्यांना निमंत्रण

Republic Day guests : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी रिक्षाचालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचाऱ्यांना निमंत्रण

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ( Republic Day guests ) राजपथावर होणारी परेड पाहण्यासाठी यंदा रिक्षाचालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना परेड पाहता यावी, असा दृष्टकोन ठेवून यंदाच्या प्रजासत्ताक दिनी रिक्षाचालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

Republic Day guests : दोन डोस घेतलेल्या लोकांनाच राजपथावर प्रवेश

दोन डोस घेतलेल्या लोकांनाच राजपथावर प्रवेश मिळणार आहे. देशाच्या विविध भागातील 600 युवा कलाकार परेडमध्ये सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालय तसेच सांस्कृतिक मंत्रालयाने वंदे भारतम स्पर्धा घेऊन या कलाकारांची निवड केलेली आहे. पश्‍चिम बंगाल तसेच तामिळनाडू या राज्यांच्या चित्ररथाला यंदा परवानगी नाकारण्यात आली होती. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती सदर राज्यांनी केली होती. मात्र त्याचा पुनर्विचार केला जाणार नसल्याचेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news