पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स फिल्म फेस्टिवल २०२३ चे आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा याठिकाणी होणार आहे. या ऐचित्याने अनेक सेलिब्रिटी या खास फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कॉर्पेटवर आपला जलवा दाखवतील शिवाय अनेक चित्रपटांचे स्क्रीनिंगदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान केली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बी टाऊन दिवा अनुष्का शर्मा आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर रेड कॉर्पेटवर दिसणार आहे. कान्समध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपचा 'केनेडी' आणि अभिनेता राहुल रॉयचा 'आग्रा' यासह अनेक भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.
६ ते २७ मे या कालावधीत होणाऱ्या या फेस्टिव्हलच्या मिडनाईट स्क्रीनिंग विभागाचा भाग म्हणून अनुराग कश्यपच्या 'केनेडी'ची निवड करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत ट्विटर हँडलने महोत्सवाच्या मिडनाईट स्क्रीनिंग विभागात अनुराग कश्यपच्या 'केनेडी'ची निवड जाहीर केली.
राहुल रॉय स्टारर 'आग्रा'चा वर्ल्ड प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाईट विभागात होणार आहे. कनू बहल यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या हिंदी चित्रपटाची निर्मिती सारेगामा इंडिया लिमिटेड, यूएफओ प्रोडक्शन यांनी केली आहे. अभिनेता मोहित अग्रवाल, रुहानी शर्मा आणि विभा चिब्बर, सोनल झा आणि आंचल गोस्वामी प्रमुख भूमिकेत आहेत.
मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्याम शर्मा यांचा 'इशानौ' यावर्षी कान्समध्ये प्रदर्शित होणार आहे.