Asia Cup Final : भारताच्‍या भेदक मार्‍यात श्रीलंकेची दुर्दशा, केवळ ५० धावांत डाव गुंडाळला

Asia Cup Final : भारताच्‍या भेदक मार्‍यात श्रीलंकेची दुर्दशा, केवळ ५० धावांत डाव गुंडाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि. १७ सप्‍टेंबर ) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र भारतीय वेगवान गाेलंदाज माेहम्‍मद सिराज, बुमराह आणि हार्दिक पंड्याच्‍या भेदक मार्‍याने श्रीलंकेच्‍या फलंदाजांची दुर्दशा झाली. सिराजने २१ धावा देत  सहा विकेट घेतल्या होत्या.  पंडयाने दाेन तर बुमराहने एक बळी घेतला.आता आशिया चषकावर आठव्‍यांदा माेहर उमटविण्‍यासाठी टीम इंडियासमाेर ५१ धावांचे लक्ष्‍य आहे. (IND vs SL Asia Cup Final)

श्रीलंकेची वन-डेतील आजवरची भारताविरुद्‍ध दुसरी निच्‍चांकी धावसंख्‍या

श्रीलंकेचा वन-डेमधील सर्वात निच्‍चांकी धावसंख्‍या ४३ आहे. दक्षिण आफ्रिका संघाने ४३ धावांमध्‍ये लंकेचा संघ गुंडाळला होता. दुसर्‍या क्रमाकांची निच्‍चांकी धावसंख्‍या वेस्‍ट इंडियजविरद्‍ध ५५ धावा होती. तर इंग्‍लंडच्‍या संघ्‍याने ६७ धावांमध्‍ये लंकेला रोखले होते. श्रीलंका संघाची चौथ्‍या क्रमाकांची निच्‍चांकी धावसंख्‍या ७३ ही भारताविरोधातच होती. आता आशिया चषक 2023 स्पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात श्रीलंकेची एकुण तिसरी अणि भारताविरुद्‍धची दुसरी निच्‍चांकी धावसंख्‍या ठरली आहे.

श्रीलंकेला 13व्या षटकात 40 धावांवर आठवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने दुनिथ वेलाल्गेला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. वेलल्गेला 21 चेंडूत आठ धावा करता आल्या. 13 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आहे. सध्या प्रमोद मदुशन आणि दुशान हेमंथा क्रीजवर आहेत. याआधी सिराजने सहा विकेट घेतल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेत गोलंदाजाने एका सामन्यात सहा विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी मिस्ट्री स्पिनर अजंथा मेंडिसने 2008 मध्ये कराचीमध्ये ही कामगिरी केली होती. त्याने भारताविरुद्ध सहा विकेट घेतल्या होत्या.

श्रीलंकेचा डाव आटोपला

सामन्यात १६ वे षटक करण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने आपल्या षटकात सलग दोन विकेट घेत लंकेचा डाव गुंडाळला. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रमोद मधुशन तर दुसऱ्या चेंडूवर पाथिरानाला बाद केले. दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे १ आणि ० धावा केल्या.

श्रीलंकेला आठवा धक्का

श्रीलंकेला 13व्या षटकात 40 धावांवर आठवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने दुनिथ वेलाल्गेला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. वेल्लावागे 21 चेंडूत आठ धावा करता आल्या. 13 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आहे.

श्रीलंकेला मेंडिसच्या रूपात सातवा धक्का

सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने लंकेला मेंडिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना संयमी खेळी करणाऱ्या मेंडिसला सिराजने क्लीन बोल्ड केले. मेंडिसने आपल्या खेळीत ३४ चेंडत १७ धावा केल्या.

श्रीलंकेला सहावा धक्का

सामन्यात सहावे षटक करण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजने षटकाच्या चौथ्या चेंडूवर श्रीलंकेला सहावा धक्का दिला. त्याने दसुन शनाकाला क्लीन बोल्ड केले. शनाकाला आपले खाते ही उघडता आले नाही. सिराजने सामन्यात चार धावा देत लंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले.

सिराजची शानदार गोलंदाजी; एकाच षटकात टिपले चार बळी

सामन्याच्या चौथ्या षटकात चार विकेट घेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंकेला बॅकफूटवर ढकलेले. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रम आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. सिराजने एका षटकात ४ बळी टिपले. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही.

सिराजचा ट्रिपल धमका; सदिरा पाठोपाठ

सामन्याच्या चौथ्या षटकांत मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने चरिथाला बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलेले. चरिथाचा झेल इशान किशनने कोणतीही चुक न करता झेल पकडला.

सिराजचा डबल धमाका; श्रीलंकेला तिसरा धक्का

संपूर्ण स्पर्धेमध्ये श्रीलंकेसाठी मॅच विनिंग खेळी करणाऱ्या सदिराला मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात पायचीत केले. सदिरा आपल्या खेळीत एकही धाव करता आली नाही.

श्रीलंकेला सलग दुसरा धक्का

बुमराहने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराजने कमाल करत पथून निसंकाला तंबूत धाडले. निसंकाने आपल्या खेळीत ४ चेंडूत २ धावांची केली. त्याचा रवींद्र जडेजाने अप्रतिम झेल टिपला.

श्रीलंकेला पहिला धक्का

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इनिंगच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुसल परेराला बाद केले. विकेटमागे विकेटकीपक केएल राहूलने त्याच्या शानदार झेल टिपला.

श्रीलंकेच्या संघात एक तर भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी

आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शनाकाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. जखमी महेश तिक्ष्णाच्या जागी हेमंता खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जखमी अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.

दोन्ही संघ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news