वेस्ट इंडिज दौ-यातून विराट कोहलीला डच्चू!, अश्विनचे ​​8 महिन्यांनंतर पुनरागमन

विराट कोहली
विराट कोहली

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या T20 संघातून माजी कर्णधार विराट कोहलीला वगळण्यात आले आहे. तर केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर संघात आर. अश्विन आणि कुलदीप यादव यांनाही जागा मिळाली आहे. तर चहलला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ 23 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

धवन वनडेसाठी कर्णधार

वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची या आधीच घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. तर विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

अमेरिकेतही स्पर्धेचे आयोजन…

वेस्ट इंडिज मालिकेतील दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत. गुरुवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा दौरा करणार आहे. 22 ते 27 जुलै दरम्यान पहिले तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर 29 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान पाच टी-20 सामने होतील. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी थेट इंग्लंडहून रवाना होऊ शकतो. कारण 17 जुलैला शेवटचा सामना खेळल्यानंतर, संघ 22 जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार आहे.

भारताचा T20 संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

भारताचा वनडे संघ..

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

आणखी वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news