आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया ‘टॉप 3’मध्ये

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया ‘टॉप 3’मध्ये

दुबई : वृत्तसंस्था : भारताने पहिल्या वनडे सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला 10 विकेटस्ने पराभूत केले. याचा लाभ टीम इंडियाला मिळाला. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आसीसी वनडे क्रमवारीत भारत 'टॉप 3'मध्ये दाखल झाला. भारताने पाकिस्तानला चौथ्या स्थानावर पिछाडीवर टाकत तिसर्‍या स्थानी झेप घेतली. भारत आता क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत 'टॉप 3'मध्ये असणारा एकमेव संघ बनला.

भारताने इंग्लंडला तब्बल 10 विकेटस्नी पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे भारताला 3 रेटिंग गुण मिळाले. पहिल्या वनडेपूर्वी भारतीय संघ 105 गुणांसह चौथ्या स्थानावर होता, तर पाक 106 गुणांसह तिसर्‍या स्थानी होता. विजयानंतर भारताचे 108 गुण झाल्याने टीम इंडिया तिसर्‍या स्थानी पोहोचली, तर पाक चौथ्या क्रमांकावर घसरला. क्रमवारीत न्यूझीलंड (126 गुण) पहिल्या स्थानी, तर इंग्लंड दुसर्‍या स्थानावर आहे. भारतीय संघ सध्या वनडेबरोबरच टी 20 व कसोटी क्रमवारीतही पहिल्या तीन अव्वल संघांत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news