India Cricketers Holi Celebration : होळीच्या रंगात रंगली टीम इंडिया; फोटो झाले व्हायरल

India Cricketers Holi Celebration : होळीच्या रंगात रंगली टीम इंडिया; फोटो झाले व्हायरल
Published on
Updated on

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाही होळीच्या रंगात रंगली आहे. मंगळवारी सराव सत्रानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममधून हॉटेलमध्ये परतताना भारतीय खेळाडूंनी जोरदार होळी खेळली. बसमध्ये टीमचे सेलिब्रेशन सुरूच होते. सलामीवीर शुभमन गिलने याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. (India Cricketers Holi Celebration)

कोहली-रोहितने उधळला गुलाल (India Cricketers Holi Celebration)

शुभमन गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माजी कर्णधार विराट कोहली गिलच्या मागे डान्स करताना दिसत आहे. त्याच्या मागे कर्णधार रोहित शर्माही दिसत आहे, गिलला व्हिडिओ बनवताना पाहून रोहित दोघांवर गुलाल उडवताना दिसत आहे. तसेच संघाचे उर्वरित खेळाडूही बसमध्येच एकमेकांवर गुलाल उधळताना दिसले.

ईशान-सूर्याचे हॉटेलमध्ये सेलिब्रेशन 

भारतीय संघाने बसमध्ये होळी खेळल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्येही होळी खेळली. सर्वजण कोरड्या रंगांची होळी खेळताना दिसत होते. ड्रेसिंग रूममध्ये होळी खेळल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनचे फोटोही समोर आले आहेत. (India Cricketers Holi Celebration)

गुरुवारपासून सुरु होणार चौथी टेस्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करत आहेत. मालिकेतील पहिले २ कसोटी सामने जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. इंदोरमधील शेवटची कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दोन्ही देशांचे पंतप्रधान राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे पंतप्रधान हा कसोटी सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज लवकरच भारतात पोहोचणार आहेत, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याच्या त्याच दिवशी अहमदाबादला जाणार आहेत. अहमदाबादचे क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात जास्त प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेडियम आहे. येथे एक लाख 32 हजार प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news