Ahmedabad Test : ‘त्या’ दोनपैकी कोणत्या खेळपट्टीवर रंगणार सामना? | पुढारी

Ahmedabad Test : ‘त्या’ दोनपैकी कोणत्या खेळपट्टीवर रंगणार सामना?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ahmedabad Test : बॉर्डर-गावसकर मालिकेतील आतापर्यंतचा सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे खेळपट्टी. मग ते नागपूर असो, दिल्ली असो की इंदूर, पण आता अहमदाबादचे मैदान एका नव्या नाट्याचा साक्षीदार बनले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी 7 मार्चला सकाळी या मैदानातील दोन खेळपट्ट्या झाकून ठेवल्याचे पहायला मिळाले.

या दृश्याने क्रिकेट वर्तुळात चर्चेल उधान आले आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळला जाणार? यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मालिकेतील निर्णायक सामना सुरू होण्यास एक दिवसापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच क्युरेटर्सने दोन खेळपट्ट्या तयार ठेवल्या आहेत का? की, अद्याप 22 यार्ड पट्टीबाबत निर्णयच झालेला नाही? अशी विचारणा होत आहे. सोमवारी संध्याकाळी मैदानावर धुळीचे उठले होते. तर रात्री रिमझिम पाऊस झाला होता. पण दोन्ही घटनांपूर्वीच मैदानावर स्प्रिंकलच्या सहायाने पाणी मारण्यात आले होते. याचा अर्थ खेळपट्ट्यांना झाकण्याआधी पाणी दिले गेले. चौथ्या कसोटीसाठी भारत कांगारूंना अशी खेळपट्टी देऊ शकतो, ज्यावर तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळेल. (Ahmedabad Test)

अक्षर-अश्विनसाठी ‘अहमदाबाद’ फेव्हरीट

2021 मध्ये, भारताने अहमदाबाद मैदानावर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले, जे 2 आणि 3 दिवसात संपले होते. 24 फेब्रुवारी 2021 रोजी या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात आला होता. सामना दोन दिवसांत संपला. या मैदानावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 112 आणि दुसऱ्या डावात 81 धावांत आटोपला होता. तर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 145 धावा करता आल्या होत्या. तर 49 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना संघाने 10 विकेट राखून दणदणीय मिळवला होता. त्या सामन्यात अक्षरने इंग्लंड फलंदाजांची भांबेरी उडवून दिली होती. त्यांच्या पहिल्या डावात अक्षरने 38 धावांत 6 आणि दुस-या डावात 32 धावांत 5 बळी घेतले होते.

4 मार्च 2021 रोजी या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना होता आणि पुन्हा एकदा सामना तीन दिवसांत संपला. या मैदानावर भारताने एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. अश्विन आणि अक्षर पटेल यांची फिरकीने त्या सामन्यात कहर केला होता. यावेळी पुन्हा अहमदाबादमध्ये असेच काहीसे पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

अहमदाबादची खेळपट्टी ग्रीन टॉप असेल?

इंदूर कसोटीच्या एक दिवस आधी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठे विधान केले होते. तो म्हणाला होता की, जूनमध्ये ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीसाठी आमचा संघ अहमदाबादमध्ये सीमिंग विकेटची मागणी करू शकतो. इंदूरमध्ये टीम इंडियाला पाच सत्रात पराभव स्विकारावा लागला होता. आता प्रश्न असा आहे की अहमदाबादमध्येही फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टी तयार केली जाईल की ग्रीन टॉप विकेट देऊन ऑस्ट्रेलियाला चकित करण्याचा प्रयत्न केला जाईल? हे 9 मार्चनंतर स्पष्ट होईल. (Ahmedabad Test)

Back to top button