First Woman Minister of Nagaland : नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री सालहूतुओनुओ क्रुसे | पुढारी

First Woman Minister of Nagaland : नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री सालहूतुओनुओ क्रुसे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागालँडमध्ये दणदणीत विजयानंतर मंगळवारी कोहिमा येथील कॅपिटल कल्चरल हॉलमध्ये एनडीपीपी आणि भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान यावेळी महिला आमदार सालहूतुओनुओ क्रुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्या नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानमंत्री मोदी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांनी मंचावरच रिओ यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. (First Woman Minister of Nagaland)

नागालँड विधानसभा २०२३ च्या निवडणुकीत इतिहास घडला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणुकीत दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यापैकी एक पश्चिम अंगामी मतदारसंघातील सलहूतुनु क्रुसे आणि दुसऱ्या दिमापूर मतदारसंघातील हेकानी जखालू या महिला आमदार आहेत. यातील क्रुसे या एनडीपीपी आणि भाजप युतीच्या आहेत, तर जखालू या भाजप आणि एनडीपीपी युतीच्या उमेदवार आहेत. (First Woman Minister of Nagaland)

रिओ यांच्याव्यतिरिक्त, तादितुई रंगकाऊ झेलियांग आणि यानथुंगो पॅटन यांनी नागालँडचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अन्य नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, टेम्जेन इम्ना अलॉन्ग आणि नागालँडच्या पहिल्या महिला आमदारांपैकी एक असलेल्या सालहूतुओनुओ क्रुसे यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.

हेही वाचा

Back to top button