Indians Most Beautiful : जगात सर्वात सुंदर भारतीयच!

Indians Most Beautiful : जगात सर्वात सुंदर भारतीयच!
Published on
Updated on

लंडन : भारतीय लोकांचा डंका सध्या जगभर वाजत आहे; पण सौंदर्याच्या बाबतीतही भारतीय जगात अव्वल स्थानावर आहेत, (Indians Most Beautiful ) हे आता दिसून आले आहे. याबाबतीत भारताने अमेरिकेसह जगभरातील देशांना मागे टाकले आहे. नुकतीच 50 आकर्षक दिसणार्‍या लोकांच्या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्‍या, तर स्विडन तिसर्‍या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रँडने हा स्टडी केला आहे. या अहवालानुसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.

सर्वात आकर्षक व्यक्तिमत्त्वे निवडण्यासाठी (Indians Most Beautiful ) सोशल मीडिया न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म रेडिटवर दिसणार्‍या पोस्टचे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये विविध देशांतील लोक होते. या पोस्टवरील कमेंटमध्ये येणार्‍या आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, गुड, हॉट आणि सेक्सी अशा शब्दांच्या आधारे त्यांचा स्कोअर तयार करण्यात आला. याशिवाय त्यांना मिळालेल्या अपव्होटस्चाही एक भाग बनवण्यात आला आणि मग 'एआय' अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन मानांकन तयार करण्यात आले.

सुंदर दिसण्याच्या बाबतीत एकूण देशांच्या यादीत ब्रिटन पहिल्या 10 मध्येही स्थान मिळवू शकले नाही. तथापि, ब्रिटनचे पुरुष खूपच आकर्षक मानले गेले आहेत आणि पुरुषांच्या यादीत ब्रिटनला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. पुरुषांच्या यादीत (Indians Most Beautiful ) भारत दुसर्‍या, इटली तिसर्‍या, अमेरिका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

अहवालानुसार अमेरिकेपाठोपाठ स्वीडन, जपान, फ्रान्स, आयर्लंड, बेल्जियम आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. या स्टडीमध्ये देशाव्यतिरिक्त सुंदर महिला (Indians Most Beautiful ) आणि देखण्या पुरुषांचीही स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली आहे. यातही भारत आघाडीवर राहिला. या यादीत भारतीय महिलांचे वर्णन जगातील सर्वात सुंदर म्हणून करण्यात आले आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या बाबतीत जपान दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामध्ये स्वीडन तिसर्‍या, पोलंड चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीच्या महिला पाचव्या क्रमांकावर आहेत. विविध देशांचे सौंदर्य दाखवण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आणि यातून त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news