मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट करत आज १२ वाजता ईडीसमोर मी हजर होणार असल्याचे म्हटले आहे. हे ट्विट त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी यांना टॅग केले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयासमोर जमू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीदी शपथ घेतली आणि अखेर सत्तासंघर्ष संपला. दरम्यान, पत्राचाळ जमिन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले होते, पण संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांचे वकील उपस्थित राहून त्यांनी विनंती अर्ज सादर केला. १४ दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली.

संजय राऊत – कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये 

आज सकाळी सकाळी ट्विट करत संजय राऊत यांनी सांगितले आहे की, " मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे." त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये.

मला अटक करा! – संजय राऊत

संजय राऊत यांना  पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने २७ जूनला समन्स बजावल्यानंतर त्यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला होता. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्वीकारणार नाही. या, मला अटक करा! जय महाराष्ट्र!

संजय राऊत यांना ई डी ED कडे हिशोब तर द्यावा च लागणार

संजय राऊत ईडी कार्यालयात आज १२ वाजता हजर राहणार आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट आज सकाळी केले. त्यानंतर भाजपा नेते किरीट्ट सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, संजय राऊत यांना ईडीकडे हिशोब तर द्यावाच लागणार .

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news