लखनौ : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे 'रण' आता चांगलेच तापले आहे. पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला मतदान होत आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचलेत. प्रचार सभेत कोण काय बोलेल? याचा नेम नाही. असेच काही 'आरएलडी' अध्यक्ष जयंत चौधरी यांच्याबाबत झालं. प्रचार सभेत ते थेट म्हणाले, मला हेमा मालिनी व्हायचं नाही. झालं, त्याच्या हे विधान राजकीय वुर्तळात चर्चेला आलं. पाहूया, 'आरएलडी' अध्यक्ष जयंत चौधरी यांनी हे विधान कशासाठी केले ते.
जयंत चौधरी हे उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे राष्ट्रीय लोक दलाचे ( आरएलडी) उमेदवार योगेश नौहवार यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी जाहीर सभेत जयंत चौधरी म्हणाले, "तू भाजपमध्ये प्रवेश कर, तुला हेमा मालिनी बनवतो," असे आश्वासन केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगेश नौहवार याला दिले होते. भाजप नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणतेही आश्वासन देत आहे. त्यांना आमच्या बद्दल कोणतेही प्रेम नाही. आत्मीयता नाही. केवळ राजकारणासाठी आमचा वापर कारायचा. आम्हाला नेमक काय मिळणार. मी भाजप नेत्यांना स्पष्ट सांगताो की, मला तर हेमामालिनी व्हायचं नाही. तुम्ही लोकांसाठी काय करणार ते सांगा, असा सवाल जयंत चौधरी यांनी भाजप नेत्यांना केला.
भाजप नेते सकाळी उठल्यापासून समाजात केवळ व्देष निर्माण करत आहेत. त्यांच्याकडे दुसरे कामच नाही, असा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएलडीने समाजवादी पार्टीबरोबर आघाडी केली आहे. उत्तर प्रदेश पश्चिम भागात या आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
हेही वाचलं का?