सातपूर पुढारी वृत्तसेवा : सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
दि. २ फेब्रुवारी बुधवार रोजी पहाटे ५ ते ५:३० वाजेच्या दरम्यान कंपनीला आग लागली. कंपनीत प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम असल्याने थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. ५ वाजून १० मिनिटांनी मनपा अग्निशमन दलास संपर्क केला असता, अग्निशमन दलाच्या ४ बंब, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा १ बंब, एमआयडीसी चा १ बंब तसेच सिडको विभागाचा एक बंब च्या साहाय्याने ९ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सकाळी १० वाजेपर्यंत ठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते.
य़ा आगीमध्ये कंपनीचा पहिला मजला संपूर्ण जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे कॅपॅसिटर बनवण्यास लागणारा कच्चा माल जळाला आहे. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजले नसून या कंपनीत एकच शिप चालू असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी नाशिक मनपा अग्निशमन केंद्र प्रमुख राजेंद्र बैरागी, व पी. जी परदेशी, आर.ए लाड यांच्या एकूण २५ कर्मचारी आग विझवण्याचे कार्य करत होते.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.