पाकिस्‍तानमध्‍ये हिंदू व्‍यापार्‍याची गोळ्या झाडून हत्‍या; सिंध प्रांतातील महिन्‍यातील दुसरी घटना | पुढारी

पाकिस्‍तानमध्‍ये हिंदू व्‍यापार्‍याची गोळ्या झाडून हत्‍या; सिंध प्रांतातील महिन्‍यातील दुसरी घटना

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्‍तानमधील सिंध प्रांतात एका हिंदू व्‍यापार्‍याची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. दरम्‍यान, या घटनेविरोधात हजारोच्‍या संख्‍येने नागरिकांनी रस्‍त्‍यावर उतरले.  यानंतर पोलिसांनी हत्‍या प्रकरणातील सूत्रधार व त्‍याच्‍या साथीदारांना अटक केली आहे.

पाकिस्‍तानमधील एक्‍सप्रेस ट्रिब्‍यून वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील घोटकी जिल्‍ह्यात व्‍यापारी सतन लाल यांचा जमीनवरुन वाद सुरु होता. काही दिवसांपूर्वीच त्‍याचा एक व्‍हिडीओही व्‍हायरल झाला होता. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं होतं की, माझी जमीन आहे. ही सोडून द्‍यावी यासाठी काही जणांकडून आपल्‍याला जीवे मारण्‍याची धमकी मिळत आहे. पाकिस्‍तान सोडून जा, अशी धमकीही मिळत आहे. मी पाकिस्‍तानच नागरिक आहे. मी येथेच मृत्‍यूला सामाेरे जाईन, असेही त्‍यांनी या व्‍हिडीओमध्‍ये म्‍हटलं होते. विशेष म्‍हणजे आपल्‍याला न्‍याय मिळावा. सुरक्षा देण्‍यात यावी, अशी मागणी सतन लाल यांनी पाकिस्‍तानचे मुख्‍य न्‍यायाधीश आणि अन्‍य अधिकार्‍यांकडे केली होती.

घोतकी जिल्‍ह्यातील दहारकी शहरात सतनलाल यांची साेमवार ३१ जानेवारी राेजी गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली हाेती. सतन लाल यांची हत्‍येच्‍या निषेधार्थ नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. हत्‍येचा सूत्रधार बचाल हादर आणि त्‍याच्‍या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

सिंध प्रांतात राजकीय स्‍वार्थासाठी अल्‍पसंख्‍यांकांच्‍या हत्‍या हाेत आहेत. हा  पाकिस्‍तानची प्रतिमा मलीन करण्‍याचा प्रयत्‍न आहे,  असा आराेप पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग पक्षाचे आमदार खेलदास कोहिस्‍तानी यांनी म्‍हटलं आहे. पाकिस्‍तानमधील सिंध प्रांतात चार जानेवारी रोजी सुनील कुमार या हिंदू व्‍यापार्‍याची हत्‍या करण्‍यात आली होती. तर ३० जानेवारीला पेशावर शहरात एका ख्रिचन नागरिकाची हत्‍या करण्‍यात आली होती.

हेही वाचलं का? 

 

Back to top button