Hardeep Singh Nijjar News | टार्गेट किलिंग, हिंदू पूजाऱ्याची हत्या, ISI कनेक्शन, जाणून घ्या हरदीप सिंग निज्जरची क्राइम कुंडली

Hardeep Singh Nijjar News | टार्गेट किलिंग, हिंदू पूजाऱ्याची हत्या, ISI कनेक्शन, जाणून घ्या हरदीप सिंग निज्जरची क्राइम कुंडली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधात वादाचे (India and Canada issue) कारण ठरलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (वय ४६) याच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हरदीप सिंग निज्जर बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात गेला होता, असे इमिग्रेशन रेकॉर्डवरून दिसून आले आहे. (Hardeep Singh Nijjar News)

२६ वर्षांपूर्वी रवी शर्मा नावाचा माणूस टोरंटोमध्ये गेला होता आणि भारत सरकारकडून छळ झाल्याचा दावा करत त्याने आश्रय मागितला. कॅनडाच्या सरकारला दिलेल्या त्याच्या प्रतिज्ञापत्रात पंजाब पोलिसांनी गंभीर छळ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा दावा केला आहे. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून खलिस्तान टायगर फोर्स (KTF) चा प्रमुख आणि भारतातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक हरदीप सिंग निज्जर होता. याबाबतचे सविस्तर वृत्त 'द टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

संबंधित बातम्या 

काय आहे वाद?

हरदीप सिंग निज्जर (Khalistan Tiger Force chief Hardeep Singh Nijjar) याची १८ जून रोजी पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सुर्रे येथील गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे. पण भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. (India vs Canada) दरम्यान, या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या आरोपावरून कॅनडाने १८ सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. (canada expels indian diplomat) दरम्यान, त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी केली. त्यांना पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले. (canadian diplomat expelled from India)

कॅनडा सरकार सुरुवातीला निज्जरने केलेल्या दाव्याशी सहमत नव्हते आणि त्याची फाइल सुमारे चार वर्षे गूढपणे खुली राहिली. या दरम्यान नवीन दावे दाखल करण्यासाठी त्याने एका कॅनेडियन नागरिक असलेल्या महिलेशी लग्न केले.

जगतार सिंग तारा याच्याशी जवळीक

गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, निज्जर हा प्लंबर म्हणून काम करत होता. निज्जरला केवळ नागरिकत्व मिळाले. २००१ मध्ये तो बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) मध्ये सामील झाला तेव्हा त्याने खलिस्तान टायगर फोर्सचा माजी प्रमुख जगतार सिंग तारा याच्या जवळच्या संबंधांचा वापर केला. तेव्हा बीकेआयचे प्रमुख सुखदेव सिंग बब्बर होते.

निज्जर आणि तारा अनेक वर्षे खलिस्तानच्या चळवळीत सक्रिय राहिले. त्यांचे जवळचे संबंध २०२४ मध्ये उघड झाले जेव्हा निज्जर ताराला भेटण्यासाठी थायलंडला गेला होता. खालिस्तान समर्थक असलेल्या जगतार सिंग ताराचा पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येत सहभाग होता आणि त्याला आर्थिक मदत केली, अशी माहिती गुप्तचर अधिकाऱ्याने दिली आहे.

त्यावेळच्या गुप्तचर नोटमध्ये म्हटले आहे की, ताराच्या सूचनेनुसार निज्जर आयएसआयच्या मदतीने थायलंडमधून पळून जाऊन पाकिस्तानात गेला. पण त्याच्या पलायनाची योजना कधीच यशस्वी झाली नाही. ताराला अखेरीस एक वर्षानंतर २०१५ मध्ये भारतात आणण्यात आले.

ड्रग्ज व्यसनी तरुणांना टार्गेट किलिंगसाठी पंजाबमध्ये पाठवले

त्यानंतर निज्जर कॅनडाला परत गेला आणि त्याने KTF चे नेतृत्व केले. या संघटनेने पंजाबमधील तरुणांना (बहुतांश ड्रग्जचे व्यसन लागलेले) मोठ्या प्रमाणात भरती करुन घेतले. कॅनडामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना हिटमेन बनवले आणि त्यांना टार्गेटेड किलिंगसाठी पंजाबमध्ये पाठवले. २०२४-२०२६ दरम्यान निज्जरने रचलेल्या काही हत्यांच्या कटाचा केटीएफचे प्रमुख सदस्य मनदीप सिंग धालीवाल याच्या अटकेनंतर पहिल्यांदा पर्दाफाश झाला होता. (Hardeep Singh Nijjar News)

हिंदू पुजारी कमलदीप शर्मा यांच्या हत्येच्या कटात सहभाग

गेल्या काही वर्षांत निज्जर आक्रमकपणे भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन दिले. २०२० मध्ये खलिस्तान टायगर फोर्स मॉड्यूल सदस्यांना प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा केल्याबद्दल यूएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. जानेवारी २०२१ मध्ये जालंधरमध्ये हिंदू पुजारी कमलदीप शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एनआयएने गेल्या जुलैमध्ये निज्जरची माहिती देण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news