कॅनडामध्‍ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

कॅनडामध्‍ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडामध्‍ये खलिस्तानी दहशतवादी ( Khalistani terrorist )  हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कॅनडातील सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरवर हल्‍ला केला. कॅनडातील शिख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेचा तो म्‍होरक्‍या होता. खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुखही होता. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याने निज्जरचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून निज्जरचा मृतदेह काढला जात असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिखांच्या एका गटाने खलिस्तान समर्थनाच्‍या घोषणा दिल्‍या.

Khalistani terrorist : ‘एनआयए’ने जाहीर केले होते १० लाखांचे बक्षीस

या प्रकरणी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर हा मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्‍ह्यातील भारसिंगपूर गावातील रहिवासी होता. खलिस्तान टायगर फोर्स आणि शीख फॉर जस्टिस यांसारख्या संघटनांवर भारतात बंदी आहे. यापूर्वी कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात झालेल्या खलिस्तानच्या सार्वमतातही शिख फॉर जस्टिस संघटनेचा हात होता. ‘एनआय’एने हरदीपसिंग निज्जरविरुद्ध देशात हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. 2022 मध्ये राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए ) निज्जरवर दहा लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. भारत सरकारने कॅनडा सरकारला निज्जरवर कारवाई करण्याचे आवाहनही केले होते.

Khalistani terrorist निज्जर मोस्‍ट वॉन्‍डेट

‘जालंधरमधील हिंदू पुजाऱ्यावर २०२१ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी निज्जरला अटक करणाऱ्या माहितीसाठी 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. या हल्ल्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी एनआयएने त्याच्यासह अन्य तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. निज्जर हा भारतातील खलिस्तान समर्थक गट ‘सिख फॉर जस्टिस’च्या फुटीरतावादी आणि हिंसक अजेंड्यालाही प्रोत्साहन देत असल्‍याचे ‘एनआयए’च्‍या अहवालात स्‍पष्‍ट झाले होते.

अलीकडेच, निज्जरचे नाव भारत सरकारने जाहीर केलेल्या यादीत समाविष्ट केले होते, ज्यात इतर ४० नियुक्त दहशतवाद्यांची नावे होती. पंजाबच्या जालंधरमधील भारसिंगपूर गावातील रहिवासी, निज्जर गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबच्या पार्किंगमध्ये त्‍याचा मृतावस्थेत आढळून आला. ज्याचा तो प्रमुख होता.

आठवडाभरात दुसऱ्या खलिस्तानी दहशतवाद्याचा मृत्‍यू

गेल्या आठवड्याभरात कॅनडामध्‍ये दोन खलिस्तानी नेत्‍यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी नेता अवतार सिंग खांडा यांचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला होता. अवतार सिंग खांडा हा खलिस्तान लिबरेशन फोर्सचे यूके प्रमुख होता. अवतार सिंग खांडा ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले होते.

हेही वाचा :

Back to top button