पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभावशाली अभिनेता आणि हॉस्ट असलेल्या मनिष पॉलसोबत भारताच्या लपलेल्या इतिहासातील थरारक रहस्यांचा शोध सध्या 'हिस्टरी हंटर' या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये घेतला जात आहे. २७ नोव्हेंबर पासून डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर नालंदा विद्यापीठाच्या नाहीसे होण्यामागील गूढ उलगडले जाणार आहे.
संबंधित बातम्या –
बुद्धांच्या काळात इसवी सन पूर्व पाचव्या शतकात स्थापन झालेले नालंदा हे ज्ञानाचे असे केंद्र होते जिथे नागार्जुन, दिगनाग आणि धर्मकीर्ती अशा दिग्गज विद्वानांनी ज्ञानार्जन केले. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असूनही जगाला या महान शैक्षणिक केंद्राची जाणीव १९ व्या शतकात झाली व त्यामुळे मनिषच्या मनामध्ये "असे का?" हा प्रश्न येतो.
नालंदा संदर्भात उत्तरे शोधत असताना मनिषने उघड केले,"असेही म्हटले जाते की, आजवर विद्यापीठाच्या केवळ १० टक्के भागामध्ये उत्खनन केले गेले आहे." तो पुढे म्हणतो, "याचा अर्थ असा की, नालंदा विद्यापीठातील लक्षणीय भागाचे अद्याप उत्खनन करणे व त्याचा शोध घेणे बाकी आहे. कदाचित ही रहस्ये येथून अजूनही उघड होऊ शकतील."
ज्या कारणामुळे नालंदा बाह्य धोक्यांना बळी पडू शकत होते. ज्यामुळे त्याचा ऱ्हास होण्याचे कारण कदाचित घडले होते, अशा एका महत्त्वपूर्ण बाबीकडेही मनिषने इशारा केला आहे. तो स्पष्ट करतो, "नालंदाच्या -हासामागील आणखी एक समोर आलेले कारण म्हणजे तंत्र बौद्ध मार्गाचा उदय. त्यामुळे भिक्षुंमध्येच मतभेद निर्माण झाले व त्यामुळेच कदाचित स्थानिक लोक व राजांनीही विद्यापीठाला मदत करणे थांबवले असावे."
'हिस्टरी हंटर'चा दुसरा भाग २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी चॅनलवर पाहायला मिळेल.