पणजी
आपल्या फिरकी गोलंदाजाने जगभरातील करोडो चाहत्यांचा लाडका श्रीलंकेचे क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांनी रेड कार्पेटवर सिने रसिकांची मने जिंकली. हातात चेंडू घेऊन रेड कार्पेटवर मुरलीधरन आल्यानंतर इफ्फीचा चंदेरी माहोल काहीसा क्रिकेटमय झाला.
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या संवाद सत्रात 'अ लीजंडरी 800 – अगेन्स्ट ऑल ऑड्स' या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरन याची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल मुरलीधरन यांच्यासोबत सोबत सहभागी झाले. मुरलीधरन यांचा चरित्रपट असलेला हा चित्रपट, या महोत्सवाचा एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू ठरला.
श्रीलंकेतील युद्ध आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली आणि क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तीमत्व बनण्यासाठी सर्व प्रतिकुलतेवर मात करतानाची आपली रोमहर्षक कथा सांगताना मुरली म्हणाला, "त्या सर्व धकाधकीच्या काळात क्रिकेट हा माझ्यासाठी विसावा होता." देशाचे प्रतिनिधित्व करणे तर सोडाच; स्वतःच्या शाळेसाठी खेळण्याचे स्वप्न देखील त्याने कधी बाळगले नव्हते.
आपल्या आयुष्यावर आधारित आगामी चरित्रपटावर चर्चा करताना, मुरली यांनी सत्यकथनाच्या महत्त्वावर जोर दिला. "हे उदात्तीकरण नाही तर वस्तुस्थिती आहे," असे ते म्हणाले. चित्रपटाची कथा, त्याने झेललेला संघर्ष आणि त्यावर मिळवलेल्या विजयाशी प्रामाणिक राहावी याकरता, चित्रपट संहितेची आपण अनेक वेळा बारकाईने वाचन केल्याचे त्यांनी नमूद केले.