IFFI Goa 2023 : नाते संबंधांवर चित्रपट बनवायला आवडतो : नुरी बिलग सेयलान

IFFI Goa 2023 : नाते संबंधांवर चित्रपट बनवायला आवडतो : नुरी बिलग सेयलान
Published on
Updated on

पणजी :   'आबाऊट ड्राय ग्रासेस' या तुर्कियेच्या नुरी बिलग सेयलान यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निवड ५४ व्या इफ्फीमधील 'मिड फेस्ट' म्हणजेच महोत्सवाच्या मध्यांतरातील चित्रपट म्हणून निवड झाली होती. चित्रपटाच्या सादरीकरानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते, नुरी बिलगे सेयलान म्हणाले, "मला मानवी नातेसंबंधांवर सिनेमा बनवायला आवडतो आणि तीच माझी चित्रपट निर्मितीची शैली आहे. मानवी भावभावना अनेकदा आपल्या कथाकथन प्रक्रियेत, अनपेक्षित आणि उत्स्फूर्त प्रसंग आणतात.

पुढे बोलताना ते म्हणाले, "मी माझ्या चित्रीकरणाच्या प्रक्रियेचे कधी नियोजन करत नाही. माझा भर संवादांचे नियोजन करण्यावर आणि मग चित्रीकरण करताना सेटवर काही तरी नवे शोधण्यावर असतो. मी अनेकदा, दुसऱ्याच कुठल्या तरी उद्देशाने चित्रीकरण करून ठेवतो, मात्र वेळेवर ते भलत्याच ठिकाणी वापरतो. आणि अनेकदा मी खूप जास्तीचे शूटिंग करून ठेवलेले असते, त्यामुळे त्यातून मला एडिटिंग अधिक सर्जनशील होण्यासाठी भरपूर साहित्य मिळते."

"मी ज्यांच्यासोबत आधी काम केले असेल, त्यांचीच निवड करण्याकडे माझा कल असतो त्यांच्यासोबत काम करणे आनंददायी अनुभव असतो."मात्र, त्यांच्या शेवटच्या चित्रपटात त्यांनी एक बदल केला, कारण त्यांना विनामूल्य सहकार्याची संधी मिळाली. "मला स्वतःला सिनेमॅटोग्राफी तंत्राची चांगली समज आहे, ज्यामुळे मला कोणत्याही छायाचित्रकाराशी जुळवून घेत प्रभावीपणे काम करता येते. मी छायाचित्रकाराचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे मूल्यांकन करतो, त्यांचा स्वभाव आणि कौशल्य या दोन्ही बाबतीत," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news