Extremely heavy rainfall: कोकण, गोव्याला IMD ने दिला अतिवृष्टीचा इशारा

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून सध्या प्रगत अवस्थेत असून, देशभरातील बहुतांश भागात सक्रिय झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दक्षिण गुजरातसह, कोकण आणि गोव्यातील काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या काळात २० सेंमीहून अधिक मुसळधार पाऊस पडणार असल्याचे IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले आहे.

डॉ. नरेश कुमार म्हणाले, येत्या दोन दिवसात मध्यप्रदेश, दक्षिण गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडणार असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात १२ सेमीपेक्षा जास्त तर गोवा आणि महाराष्ट्रातील कोकणातील काही भागात १२ सेमीपेक्षा देखील जास्त पाऊस कोसळणार असल्याचे देखील ते म्हणाले.

Extremely heavy rainfall: पुढील ५ दिवस पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार

मान्सून वेगाने वाटचाल करत आहे. दरम्यान बुधवारी (दि.२९ जून) मान्सूनने जवळपास ९९ टक्के देश व्यापला असून, तो लवकरच संपूर्ण देश व्यापणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान पुढील पाच दिवसात पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे देखीलIMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ नरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news