सातारा : ठोसेघर धबधबा फेसाळला!, हिरवे- हिरवे गार गालिचे जिकडे- तिकडे चोहीकडे! | पुढारी

सातारा : ठोसेघर धबधबा फेसाळला!, हिरवे- हिरवे गार गालिचे जिकडे- तिकडे चोहीकडे!

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटकांचे आकर्षण असलेला ठोसेघर धबधबा काल बुधवार (दि. २८) रोजीपासून वाहू लागला आहे. डोंगर दरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने परिसर पर्यटकांना साद घालू लागल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे.

‘डोंगरदरी कपारीतून, जलधार लागली झरू, शुभ प्रभात घालीमोह, मन लागे भिरभिरू’ या काव्यपंक्तीप्रमाणे हा परिसर दिसू लागला आहे.

ठोसेघर धबधब्यावर यावर्षी ठोसेघर गॅलरी आणि ज्या ठिकाणी धबधब्याचा पाण्याचा प्रवाह पडतो त्या ठिकाणी गुहा करण्यात आली आहे. यामुले धबधब्याच्या पाण्यात जाळीच्या कडेला उभे राहून भिजण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. यावर्षी धबधबा व्यवस्थापनाने वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यासाठी अडोशे तयार केले आहेत. तसेच निसर्गाची माहिती सांगणारे फलक बसण्यासाठी बाकडी अशी व्यवस्था केल्याने पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पावसात भिजल्यावर उभे राहण्यासाठी नैसर्गिक कुटी ही उभारण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button