Hardik Pandya Shares Video : व्‍हील चेअर ते टीम इंडियाचा कर्णधार, हार्दिकने शेअर केला खडतर प्रवासाचा व्‍हिडिओ

Hardik Pandya Shares Video : व्‍हील चेअर ते टीम इंडियाचा कर्णधार, हार्दिकने शेअर केला खडतर प्रवासाचा व्‍हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयुष्‍य जगताना प्रत्‍येक दिवस सारखा नसतो, चढ-उतार येतच असतात. कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड द्‍यावे, ही सारी उपदेशाची वाक्‍ये ऐकायला बरी वाटतात. मात्र सत्‍यात उतरवायला कठीण असल्‍याचा अनुभव प्रत्‍येकाला येतो. कारण कठीण प्रसंगातून येणार्‍या हतबलतेमुळे अनेक जण कोलमडून पडतात. मात्र यातून जे उभारी घेतात तेच यशाच्‍या उत्तुंग शिखर गाठतात. हे वारंवार सिद्‍ध झाले आहे. हे सारं सांगण्‍याचे कारण म्‍हणजे, आपल्‍या आयुष्‍यात चढ-उताराचा प्रवास टीम इंडियाचा अष्‍टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून शेअर केला आहे. ( Hardik Pandya Shares Video )

 इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या मालिकेत हार्दिकची कामगिरी ठरली स्‍मरणीय

मागील काही दिवस हार्दिक पंड्या हा टीम इंडियाचा तारणहार ठरला आहे. नुकत्‍याच झालेल्‍या इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या वन डे मालिकेत त्‍याची कामगिरी स्‍मरणीय ठरली. या मालिकेतील तिसरी व निर्णायक वन डे सामन्‍यात हार्दिकने गोलंदाजीत आपल्‍या करिश्‍मा दाखवत इंग्‍लंडला बॅकफूटवर नेले. तर फलंदाजीतऋषभ पंत बरोबर ११३ चेंडूत १२५ धावांची भागीदारी करत भारताचा मालिका विजय या दोघांनी सुकर केला होता.

इंग्‍लंडविरुद्‍चया तिसर्‍या वन डे सामन्‍यातील कामगिरीमुळे हार्दिकच्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद झाली. वन डे सामन्‍यात चार बळी आणि ५० पेक्षा अधिक धावा करणारा हार्दिक भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी के. श्रीकांत, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी केली होती. अन्‍य चार खेळाडूंनी आशिया खंडातच अशी कामगिरी केली होती. मात्र आशिया खंडाबाहेर अशी दमदार कामगिरी करणारा हार्दिक हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्‍हणजे, इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या तिन्‍ही फॉर्मेटमध्‍ये हार्दिकने चारपेक्षा अधिक बळी आणि ५० पेक्षा अधिक धावा केल्‍या आहेत.

दुखापतीने हार्दिक खचला नाही

मागील काही दिवस हार्दिकची कामगिरी उंचावली आहे. मात्र हार्दिक २०१९ मध्‍ये पाठीच्‍या दुखण्‍यामुळे त्रस्‍त होता. त्‍याच्‍या पाठीवर शस्‍त्रक्रियाही झाली होती. याचा परिणाम त्‍याच्‍या कामगिरीवर झाला होता. यामुळे त्‍याला संघातून वगळण्‍यातही आले होते. मात्र हार्दिक खचला नाही. तो पुन्‍हा एकदा नव्‍या उमेदीने सर्व परिस्‍थितीला सामोरे गेला. आयपीएल २०२२मध्‍ये हार्दिकचे नवे रुप सर्वांना पाहायला मिळाले. गुजरात टायटन्‍सचा कर्णधार म्‍हणून तो मैदानात उतरला.

पहिल्‍यादा हा संघ आयपीएलमध्‍ये सहभागी झाला होता. हार्दिकने या टीमची उत्तम बांधणी केली. त्‍याचीही फलंदाजी बहरली. पहिल्‍याचा प्रयत्‍नात हार्दिकच्‍या नेतृत्‍वाखालील गुजरात टायटन्‍सचे आयपीएल विजेतेपद पटकावले. यानंतर नुकत्‍याच झालेल्‍या आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्‍याने भारताचे नेतृत्व केले.

Hardik Pandya Shares Video : भावनिक व्‍हिडिओ केला शेअर

त्‍याने मागील चार वर्षाचा आपल्‍या आयुष्‍याती चढ-उताराचा एक भावनिक व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्‍ये हार्दिक हा व्‍हिल चेअर ते पुन्‍हा मैदान गाजविण्‍याचा प्रवास त्‍याने मांडला आहे. २०१९ दुखापतीमुळे त्रस्‍त झालेल्‍या हार्दिकवर शस्‍त्रक्रिया झाली. त्‍यानंतर तो काही दिवस व्‍हिल चेअरवर होता. सार्‍या शारीरिक अडचणीवर मात करत तो पुन्‍हा उभारला हेच हा व्‍हिडिओ सांगतो.नेहमीच परिस्‍थितील दोष देत हतबल होणार्‍यांसाठी हार्दिकने शेअर केलेला व्‍हिडिओ प्रेरणादायी ठरणार आहे.

इंग्‍लंड विरुद्‍धच्‍या तिसरा वन डेनंतर माध्‍यमांशी बोलताना हार्दिक म्‍हणाला होता की, "नियमितपणे गोलंदाजी करणे हे मला खूपच आंनद देते. आयपीलए असो की अन्‍य मालिका मला प्रशिक्षणसाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी हा फिटनेसाठी लागतो. मला मैदानात उतरवल्‍यावर १०० टक्‍के योगदान देणे आवडते. आयपीएलनंतर मी दक्षिण आफ्रिका मालिकेत गोलंदाजी केली. मी केवळ एकच षटक टाकले. यानंतर दोन सामन्‍यात मी गोलंदाजी केली नाही. माझ्‍यासाठी गोलंदाजी खूप महत्‍वाची आहे."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news