पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा (HBD Parineeti Chopra) ने २०११ मध्ये 'लेडीज वर्सेज रिकी बहल' (Ladies vs Ricky Behl) मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती सपोर्टिंग भूमिकेत दिसणार होती. परंतु, मुख्य अभिनेत्री म्हणून 'इशकजादे' (HBD Parineeti Chopra) तिचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटामध्ये परिणीतीसोबत अर्जुन कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार होता. परिणीतीचा २२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. या औचित्याने तुम्हाला माहिती नसलेला एक किस्सा आम्ही येथे सांगत आहोत.
मीडियाशी बोलताना परिणीतीने सांगितलं होतं की, बालपणी आमच्याकडे इतके पैसे नव्हते की, आम्ही कार खरेदी करू शकू. यामुळे मी शाळेला सायकलवरून जात असे. माझे वडील देखील माझ्यासोबत काही अंतर यायचे. वडील परतल्यानंतर रोज काही मुले माझा पाठलाग करायचे. मला त्रास द्यायचे. माझा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न करत असतं.
एक वेळ अशी होती, जेव्हा या सर्व गोष्टींचा मला राग यायचा. इतकी त्रस्त झाले होते की, मला माझ्या पालकांचा द्वेष वाटू लागला होता. कारण, ते मला सायकलवरून शाळेला पाठवत असतं. जेव्हा मी नकार द्यायचे, तेव्हा ते मला म्हणायचे की, तुला स्ट्रॉन्ग बनवण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
तेव्हा मी चिढायचे. पण, त्याची किंमत कळतेय. परिणीती म्हणाली, 'जर कुणालादेखील अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल, तेव्हा त्यांच्या तोंडावर एक पंच मारून त्यांना सामोरे जा!
अभिनेत्री परिणीतीने इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत. काही दिवस आधी तिने चित्रपट 'उंचाई' च्या सेटवरून सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. सेटवर तिचे को-स्टार्स आणि टीमच्या क्रूने या खास औचित्याने त्यांना सरप्राईज दिलं होतं. मुंबईच्या महबूब स्टुडिओमधून व्हिडिओ शेअर करताना परिणीतीने लिहिलं की, 'आतापर्यंतचे उत्तम सरप्राईज.' 'उंचाई'च्या संपूर्ण टीमने माझ्या या दिवसाला खास बनवलं. मी काहीतरी चांगलं काम केलं आहे, त्यामुळेच मला इतक्या मोठ्या दिग्गजांसोबत सेलिब्रेट करण्यासाठी आणि शिकण्य़ाची संधी मिळाली. १० वर्षे आणि मी केवळ आता सुरुवात केली आहे.' यावेळी अमिताभ बच्चन, बोमन ईरानी आणि अनुपम खेर उपस्थित होते.