नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
काल सायंकाळी झालेल्या पावसात वीज पडून शेतकरी ठार झाल्याची घटना धाऊर येथे घडली. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह पती शेतातून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45) रा. धाऊर यांच्यावर वीज पडून ते जागीच ठार झाले.
त्यांची पत्नी त्यांच्या पासून काही अंतरावर असल्याने विजेच्या तडाख्यातून वाचली. या घटनेची माहिती पोलीस पाटील मनीषा पताडे यांनी पोलीस व महसूल विभागाला कळवली. दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व कर्मचारी धनंजय शिलावटे करीत आहेत.