HBD Ajay Devgn : अजयचा आलिशान बंगला दिसतो तरी कसा?

ajay devgn
ajay devgn

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (HBD Ajay Devgn) २ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहे. अजय देवगण म्हणजेच विशाल देवगनचा (HBD Ajay Devgn) जन्म २ एप्रिल १९६९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. अजय देवगन जेव्हा २२ वर्षांचा होता तेव्हा त्याने फूल और कांटे या चित्रपटातून पदार्पण केले होते. आज तो हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपैकी एक आहे. गंभीर भूमिकांपासून ते अॅक्शन आणि कॉमेडीपर्यंत, अजय देवगण विविध पात्रांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवलीय. त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अजय त्याच्या लग्झरी लाईफस्टाइलसाठीही ओळखला जातो.

अजय देवगन
अजय देवगन
अजय देवगन मुलांसमवेत
अजय देवगन मुलांसमवेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

८४ कोटींचे खासगी जेट

अजय देवगण हा अशा भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्याकडे स्वतःचे खासगी जेट आहे. हॉकर ८०० असे या खासगी जेटचे नाव आहे. त्याने २०१० मध्ये ६ आसनी खासगी जेट खरेदी केले होते. त्याची किंमत ८४ कोटी रुपये आहे. शूटिंग, प्रमोशन आणि वैयक्तिक सहलींसाठी तो त्याचा वापर करताना दिसतो.

अजय देवगनची पत्नी काजोल
अजय देवगनची पत्नी काजोल

अजय आणि काजोलचे आलिशान घर

अजय मुंबईत शिवशक्ती येथे राहतो. त्यांचा बंगला मुंबईतील पॉश एरिया जुहू येथे आहे. हा बंगला आतून आणि बाहेरून खूप सुंदर दिसतो. त्याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. अजय त्याच्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहतो.

अजय देवगन – काजोल आपल्या मुलासोबत
अजय देवगन – काजोल आपल्या मुलासोबत

अजयच्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, लायब्ररी आणि स्पोर्ट्स रूमदेखील आहे. अजय पार्ट्यांना जात नाही असे तुम्ही ऐकले असेलच. याशिवाय तो हायफाय होण्याचेही टाळतो आणि त्याचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

कोजोल
कोजोल

असे म्हटले जाते की, अजय हा भगवान शिवचा मोठा भक्त आहे. म्हणून त्याने आपल्या बंगल्याला शिवशक्ती असे नाव दिले आहे. या बंगल्यात चार बेडरूम आहेत. सर्व बेडरूम प्रत्येकाच्या आवडीनुसार डिझाईन केल्या आहेत.

अजय आणि काजोल यांनी भिंतीपासून ते फ्लोअरिंगसाठी पांढरा रंग निवडला आहे. अजयचे लंडनच्या पार्क लेनमध्ये एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत ५४ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचा मुंबईत आणखी एक प्लॉट आहे.

अजय देवगन मुलगी न्यासासोबत
अजय देवगन मुलगी न्यासासोबत

अजय देवगणकडे Maserati Quattroporte आहे. ते विकत घेणारा अजय पहिला भारतीय आहे. सध्या या कारची किंमत १ कोटी ७९ लाख रु. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हरसह अनेक वाहने आहेत, ज्यांची किंमत करोडोंची आहे.

सूत्रांनुसार, अजय केवळ एका चित्रपटासाठी २२ कोटी रुपये घेतो. केवळ इतकचं नाही तर अजय एका जाहिरातीसीठी ५ कोटी रुपये घेतो. याशिवाय तो ६ कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरतो. त्याच्याकडे range rover देखील आहे. याची किंमत २ कोटी रुपये आहे.

अजयचं स्वत: चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. याची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्याने आपल्याच प्रोडक्शन अंतर्गत हेलीकॉप्टर ईला चित्रपट आणला होता.

अजय देवगनची पत्नी काजोल
अजय देवगनची पत्नी काजोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news