‘बिग बी’ अमिताभ बच्चनसमवेत रश्मिका मंदाना! | पुढारी

‘बिग बी’ अमिताभ बच्चनसमवेत रश्मिका मंदाना!

पुढारी ऑनलाईन : ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी आता ‘गुड बाय’ या चित्रपटाच्या सेटवरील एक सुंदर छायाचित्र सोशल मीडियात शेअर केले आहे. त्यामध्ये ‘पुष्पा’मुळे हिंदी पट्ट्यातही रातोरात स्टार बनलेली रश्मिका मंदाना त्यांच्यासमवेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ट्रेंडिंग अ‍ॅक्ट्रेस असलेल्या रश्मिकाबरोबर अमिताभ ‘गुड बाय’ मध्ये दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे ऋषिकेशमध्ये शूटिंग सुरू आहे.

बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील एक छायाचित्र शेअर केले. यामध्ये दोघेही हसत असताना दिसून येतात. कॅप्शनमध्ये ‘बिग बी’ने ‘पुष्पा’ असे लिहिले आहे आणि त्यावर चाहते ‘बिग बी’ची गंमतही करीत आहेत. चित्रपटात अल्‍लू अर्जुनचे नाव ‘पुष्पा’ होते तर रश्मिकाचे नाव ‘श्रीवल्‍ली’ होते. त्यामुळे काही चाहत्यांनी कमेंटमध्ये म्हटले, पुष्पा नव्हे सर…श्रीवल्‍ली! अर्थात ‘बिग बी’ने ‘पुष्पा’ची लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून अशी कॅप्शन दिलेली असू शकते.

रश्मिकानेही या फोटोवर ‘सर, हम झुकेगा नही’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हे छायाचित्र शेअर केले असून त्यामध्ये म्हटले आहे की ‘सर…यू आर फायर!’ यामध्ये ‘फायर’ शब्दाऐवजी इमोजी असून ‘सर’नंतर काही हसण्याची व हार्ट इमोजीही आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button