मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ( Bidri Factory election ) आमच्याबरोबर कोण येणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर होता. यावेळी तो आमच्याबरोबर राहील असं मला वाटत नाही. आमच्याबरोबर कोण येणार?, कोण नाही? हे आपणांस माहित आहे. पण पाच वर्षात केलेल्या चांगल्या कारभारामुळे आपल्याकडे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या ज्यादा आहे आणि मर्यादा ही खूप आहेत. त्यामुळे आपण सर्वांनाच संधी देऊ शकत नाही. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मुरगूडात पार पडलेल्या मेळाव्यात म्हणाले.
संबधित बातम्या
बिद्रीच्या निवडणुकीत याही वर्षी कागल तालुक्याचा सर्वच बाबतीत वरचष्मा राहील हे स्पष्ट करत ए. वाय .पाटील आज हजर नाहीत याचा उल्लेख यावेळी केला. के. पी. पाटील, हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील ही अंगे तीन आहेत मात्र शरीर एकच आहे. यामध्ये कधीच ताटातूट होणार नाही असा स्पष्ट उल्लेख वैद्यकीय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते मुरगुड ( ता. कागल ) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभासदांच्या मेळावा प्रसंगी बोलत होते.
विरोधकांवर टीका करताना मुश्रीफ म्हणाले की, बिद्रीच्या निवडणूक निमित्ताने काही कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आई अंबाबाई त्यांना बघून घेऊ दे. हे या निमित्ताने सांगत आहे. आणि या सगळ्या संकटाचा निपात होईल हे स्पष्ट करतो. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर होईल. २६ तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होईल असे निवडणूक अधिकारी यांच्याकडून आम्हाला समजले आहे. पण वरून फोन नाही आला किंवा काही अडचण नाही आली तर हा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. अन्यथा थोडा विलंब लागेल असेही त्यांनी लिहिले आहे.
ज्यावेळी बिद्रीची निवडणूक जाहीर होते त्यावेळी माझ्या काळजाचा ठोका चुकतो असे स्पष्ट करुन मुश्रीफ यांनी मागील निवडणुकीत गटनिहाय मिळालेल्या मताधिक्याची माहिती दिली. तर कागल तालुका विजयामध्ये मोलाची भूमिका पार पाडले असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी के. पी. पाटील, प्रवीणसिंह पाटील यांची भाषणे झाली. स्वागत वसंतराव शिंदे यांनी तर प्रास्ताविक भैय्या माने यांनी केले. प्रसंगी युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, जयदीप पवार, शितल फराकटे, मनोज फराटे, धनाजीराव देसाई, विकास पाटील, दिग्विजय पाटील, प्रवीणसिंह भोसले, सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, राजू आमते आदी मान्यवर उपस्थित होते. आभार जगन्नाथ पुजारी यांनी मानले. ( Bidri Factory election )
हेही वाचा :