नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महागाईमुळे लोक आधीच त्रस्त आहेत. अशातच सोने-चांदीचे दर तेजीने वाढत आहेत. यामूळे अनेकांच्या लग्नाचे बजेट कोलमडले आहे. मंगळवारी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. नागपूर शहरात सोन्याचे दर प्रतिग्रॅम 57 हजारांच्याही वर गेले आहेत.
नवीन वर्षात सोनेच्या दरात नविन रेकॉर्ड बनले आहे. तर चांदीचेही भाव प्रतिकिलो 69 हजारांवर गेले आहेत. नवीन वर्ष सुरू होताच सोने 55 हजार रुपयांवर गेले आणि आता 57 हजारांचा टप्पा गाठला आहे. येत्या काळात सोन्याचा दर 60,000 रुपयांच्या वर जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोन्या – चांदीचे वाढलेले दर बघून लग्नकार्य असलेले कुटुंब चिंतेत आहेत.
अनेक लोक कमी बजेटमध्ये हलक्या वजनाचे दागिने खरेदी करीत आहेत. व्यापारी लग्नसराईची मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करीत असतात. पूर्वी लग्नाकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जात होती. अलिकडे हा ट्रेंड काहीसा बदलला आहे. लग्न कार्य असलेल्या घरांमध्ये थोडे थोडे करून सोने खरेदी केले जाते. त्यामुळे एकदम भार येत नसल्याची ग्राहकांची भावना आहे. एकाच वेळी सोने खरेदी आता आपल्या आवक्यात नसल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होताना दिसते.
अशावेळी महिलावर्गाकडून सोन्याचा मुलामा असेलेल्या एक ग्रॅमच्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे. हे दागिने वापरणा-या महिलांचा वर्गही वाढत आहे.
.हेही वाचा