मोठी बातमी - इनकम टॅक्स कमी होण्याची शक्यता; नव्या योजनेचे स्लॅब बदलणार | Rate changes in new income tax structure | पुढारी

मोठी बातमी - इनकम टॅक्स कमी होण्याची शक्यता; नव्या योजनेचे स्लॅब बदलणार | Rate changes in new income tax structure

अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत आहेत. Voluntary Income Tax Framework मधील टॅक्सचे दर कमी केले जाण्याची शक्यता आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अर्थ विभागातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. केंद्र सरकार १ फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहे, यात ही घोषणा केली जाईल. या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे.

२०२०मध्ये केंद्र सरकराने नवी ऐच्छिक इनकम टॅक्स योजना जाहीर केली होती. कर भरणा सुटसुटीत व्हावा या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली होती. यामध्ये इनकम टॅक्सचे ६ नवीन स्लॅब करण्यात आले आणि स्लॅबनुसार इनकम टॅक्सचे दर कमी करण्यात आले. पण गृहकर्ज आणि विमा यांची इनकटॅक्सची सवलतची तरतुद या योजनेत नसल्याने अनेकांनी याकडे पाठ फिरवली होती.

२०२०ला लागू केलेल्या योजनेनुसार कपातीशिवाय (without deductions) इनकमटॅक्सचे सहा स्लॅब आहेत. ५ टक्के (२.५ लाख ते ५ लाख), १० टक्के (५ लाख ते ७.५ लाख), १५ टक्के (७.५ लाख ते १० लाख), २० टक्के (१० लाख ते १२ लाख), २५ टक्के (१२.५ लाख ते १५ लाख) आणि ३० टक्के (१५ लाखांपुढे) असे हे स्लॅब आहेत. तर कपातीसह (With Deduction) इनकम टॅक्सचे 5 टक्के, २० टक्के आणि ३० टक्के असे तीन स्लॅब आहेत. कोणत्या प्रकारे इनकम टॅक्स आकारला जावा, हे करदात्यांनी स्वतः ठरवायचे असते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. इनकम टॅक्समध्ये सवलत दिली जावी असा दबाव सध्या केंद्र सरकारवर आहे. मध्यवर्गीयांकडून असलेल्या दबावाची आपल्याला जाणीव आहे, असे सीतारामन यांनी रविवारी म्हटले होते.

हेही वाचा

Back to top button