सोलापूरचे नाव "हुतात्मा नगरी" करा : काकासाहेब कुलकर्णी | पुढारी

सोलापूरचे नाव "हुतात्मा नगरी" करा : काकासाहेब कुलकर्णी

सोलापूर,पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूरचे नाव हुतात्मा नागरी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशचे प्रवक्ता प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर हे हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा कुर्बान हुसेन, हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, या हुतात्म्यांचे शहर आहे. संपूर्ण भारतात सोलापूरला देश स्वातंत्र्यपुर्वीच स्वात्यंत्र मिळाले आहे आणि ते याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मिळाले.

आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. याच धर्तीवर सोलापूरचे नाव “हुतात्मा नगरी” केल्यास सोलापुरातील स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचे योगदान हे संपूर्ण देशभर पसरेल व सोलापूरचा जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर येईल. या उद्धेशाने सोलापूरचे नाव “हुतात्मा नगरी” करा अशी मागणी करण्यात आली आहे.

-हेही वाचा 

कोल्‍हापूर : दत्तवाडच्या कुस्ती मैदानात पैलवान मनोज गावडे यांनी मारली बाजी

सांगली : शासनाने धरणग्रस्तांच्या जमीनीबाबत नोटीसा काढल्याने नागरीकांनी थेट तहसील कार्यालयात मांडला ठिय्या

आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित

Back to top button